" पुढील 50 वर्षाचा विचार करुन पंढरपूरचा विकास करणार".....मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 पंढरपूर...... गेली कित्येक वर्ष पंढरपूर शहरांमध्ये मंदिर परिसरामध्ये होणारा कॅरीडोर हा प्रकल्प राबविला जाणार म्हणून चर्चिला जात होता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पंढरपूर शहरातील बाधित तसेच कॅरिडॉर झाला पाहिजे म्हणणारे लोकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले पुढील पन्नास वर्षाचा विचार करून पंढरपूर शहराचा विकास केला जाणार आहे.

.    विठुरायाच्या नगरीमध्ये वर्षामधून चार यात्रा भरल्या जातात या चारी यात्रेला वारकरी भाविक भक्त ही लाखोच्या संख्येने पंढरपूर शहरांमध्ये येत असतात या भाविकांना मंदिर परिसर तसेच मार्गावर अतिशय दाटीवाटीने मार्गक्रमण करावे लागते परिसरा मध्ये  अरुंद रस्ते तसेच अरुंद गल्ली बोळ असल्यामुळे भक्तांना वावर करताना अडचण येते. त्यामुळे यात्रा कालावधीमध्ये भरपूर बांधवांना कुठलीही अडचण वादा न येण्यासाठी मंदिर परिसरातील भागांमध्ये असलेले दुकाने घरे, वाडे हे बाधित होणार असून या सर्व इमारती जागेची भूसंपादन केले जाणार आहे त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी शास नाने मंजूर केलेला आहे याच परिसरामध्ये भाविकांच्यासाठी विविध उपयोगी सभागृहे तसेच कार्यालय कीर्तन हॉल आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे प्रदक्षिणा मार्ग हा देखील मोठा करण्याचे नियोजन शासनाचे आहे. या परिसरामध्ये असलेले पुरातन मंदिरे मठ यांचे जतन व संवर्धन केले जाणार आहे आणि या परिसरात मध्ये असलेला पुरातन ऐतिहासिक हा वारसा जपला जाणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

.    नुकत्याच झालेल्या आषाढी यात्रेच्या दरम्यान 30 ते 32 लाख वारकरी भाविक भक्त आल्याचे शासनाने जाहीर केले ही भाविकांची वाढणारी गर्दी पाहता छत्रपती शिवाजी महाराज चौक गजानन महाराज मठ परिसर अर्बन बँक ते शिवाजी चौक त्याचप्रमाणे संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून आली. 2026 या वर्षांमध्ये जर एवढी गर्दी होत असेल तर उद्याच्या येत्या पन्नास वर्षांमध्ये या परिसरामध्ये काय अवस्था असेल याचे नियोजन शासनाने आत्ताच करायला हवे शिवाजी चौक ते अर्बन बँक आणि शिवाजी चौक ते गजानन महाराज मठ परिसर हा मोठा आणि मोकळा केल्यास वारकरी भावी भक्तांना येत्या 50 वर्षांमध्ये सहजरीत्या वावर करता येईल त्यांना कुठल्याही अडचणी या येणार नाहीत असे कित्येक पंढरपूर वाशी यांना व वारकरी भक्तांना वाटते. महाराष्ट्र शासनाने पंढरपूर साठी आयोजित केलेला हा कॅरिडॉर ची व्याप्ती वाढवली जावी त्याची गरज आज नाही तर येत्या कित्येक वर्षासाठी आवश्यक ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"