" महाराष्ट्राचा वारकरी पाहुणा सुविधा वाचून वंचित राहता कामा नये " शासनाच्या निधीचा योग्य तो वापर व्हावा.
पंढरपूर....
नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आषाढी यात्रे पूर्व नेहमीप्रमाणे पंढरपूर शहराला भेट दिली आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या असंख्य लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांच्या साठी सुखसुविसुविधा आरोग्य स्वच्छ पाणी निर्मल चंद्रभागा नगरी याकरिता पाच कोटी रुपये चा निधी काही मिनिटातच जाहीर केला यापूर्वी देखील पाच कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाने पंढरपूर तीर्थ विकासासाठी दिलेला आहे आता दहा कोटी रुपये चा निधी या आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहर व पंढरपूर शहरांमध्ये येणाऱ्या असंख्य भाविक भक्तांच्या साठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापर केला जाणार आहे या निधीचा वापर योग्य प्रकारे व्हावा अशी माफक अपेक्षा पंढरपूर रहिवासी आणि वारकरी संप्रदायांमधील असंख्य भाविक भक्त करीत आहे. महाराष्ट्राचा वारकरी पाहुणा सुविधा वाचून वंचित राहता कामा नये अशी मनोकामना पंढरपूर वाशी करीत आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पंढरपूर येथे भेट दिली असता सर्व ठिकाणी जाऊन वारकरी भाविक भक्तांचे साठी कुठल्या सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत त्याची पाहणी केली त्याचवेळी पंढरपूर शहराच्या नगराध्यक्ष प्रणिती ताई भालके आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विधानसभेचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी पंढरपूरच्या ठिकाणी येणाऱ्या असंख्य भाविक भक्तांच्या साठी सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना कुठलीही भासणार नाही याची दक्षता घेण्यासाठी त्यांनी पाच कोटी रुपये निधीची मागणी केली असता ती मागणी काही मिनिटातच एकनाथराव शिंदे यांनी मंजूर केली त्यामुळे आपण केलेला मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पाठिंबा देत त्यांनी त्वरित पाच कोटी रुपये चा निधी मंजूर केला आहे या निधीमधून वारकरी भाविक भक्तांसाठी स्वच्छ पाणी आरोग्यदायी वातावरण आणि चंद्रभागेची स्वच्छता पिण्याचे पाणी स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ पंढरपूर शहर हे या निधीमधून केले जाणार आहे अशी माहिती आमदार समाधान दादा अवताडे यांनी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा