"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक 2025 या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये पंढरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज अनेक महिला भगिनींनी भरलेला होता .त्यापैकी एका उमेदवारांनी आज रोजी डॉ प्रणिता ताई भालके यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. 

     माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सारिका साबळे यांनी आज रोजी डॉ प्रणिता ताई भालके यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये होणारी मताची विभागणी ही टळलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शामल ताई शिरसाट आणि डॉ प्रणिता ताई भालके यांच्यामध्ये लढतीची रंगत पहावयास मिळणार आहे. 

    यावेळी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके म्हणाल्या सौ सारिका साबळे यांनी मला पाठिंबा देऊन या निवडणुकीमध्ये मला निवडून येण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. पंढरपूर शहराच्या विकासासाठी मी कामे करणार आहे. असे डॉ. प्रणिता ताई भालके यावेळी त्यांनी सांगितले.

      याप्रसंगी पुढे पंढरपूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले म्हणाले डॉ.प्रणिता ताई भालके यांना सर्वतोपरी सहकार्य करून निवडून आणण्याचा आम्ही अथक पणे प्रयत्न करणार आहोत. असे नागेश काका भोसले आणि आपल्या मनोगतामध्ये आपले मत व्यक्त केले. 

         पंढरपूर नगरपालिकेच्या  नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधील एक मान्यवर उमेदवार सौ सारिका साबळे यांनी माघार घेतल्यामुळे साबळे यांच्या मताचा लाभ डॉ प्रणिता ताई भालके यांना होणार आहे. त्यामुळे प्रणिता भालके यांचा यशाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...

"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....