" आषाढी यात्रेमधील ही गर्दी पाहता कॅरिडॉर हा गरजेचा असून प्रदक्षना मार्ग व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी देखील कॅरिडॉर ची गरज "


 पंढरपूर....

.   आज विठुरायाच्या नगरीमध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने एकादशीच्या दिवशी 25 ते 30 लाख लोकसंख्या ही पंढरपूर शहरांमध्ये दिसून येत आहे. मंदिर परिसरामध्ये गर्दीने दाटीवाटी झालेली नेहमीप्रमाणे दिसत आहे. या भागांमधून कॅरिडॉर हा होणार आहे. मंदिर परिसरातील असंख्य घरे दुकाने हे बाधित होणार आहेत हे जरी सत्य असले तरी येत्या 25 ते 50 वर्षाच्या कालावधीमध्ये विठुरायाकडे येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या ही प्रत्येक वर्षी वाढत जाणार आहे. तरी पंढरपूर शहरातील जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो भला मोठा केला तरच भाविक भक्त हे या प्रदक्षिणा मार्गावर फिरू शकणार आहेत. अन्यथा पुन्हा या परिसरामध्ये गर्दीची दाटीवाटी आणि चेंगराचेंगरी ही उद्भवू शकते तरी शासनाने कॅरिडॉर प्रमाणे प्रदक्षिणा मार्गावरील देखील रस्ते डीपी अंतर्गत न घेता ते कॅरिडॉर मध्ये घेऊन रस्ते मोठे करण्याचे नियोजन केले तरच या गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. अन्यथा खूप मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते.

.     काही वर्षांपूर्वी पंढरपूर शहरातील कॅरिडॉर हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून होणार असल्याचे बोलले जात होते व तशी चर्चा देखील संपूर्ण शहरांमध्ये सुरू होती परंतु शासनाने चौफाळा मधील कृष्णाच्या मंदिरापासून कॅरिडॉर ची सुरुवात होणार आहे असे नकाशाद्वारे सूचित करण्यात आले आहे. परंतु आजची गर्दी पाहता छत्रपती शिवाजी चौकापासून दीडशे ते दोनशे मीटर परिसर हा मोठा केला तरच या गर्दीचे नियंत्रण होऊ शकणार आहे हे आजच्या गर्दीच्या अनुमानानुसार दिसून येत आहे पाहूया शासन काय करते ते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"