" कास्ता पाईप कंपनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरी नगरीत हजर "


 पंढरपूर....

    आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविक भक्तांना व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती च्या वतीने सेवा उपलब्ध करून देणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी यांना ऊन वारा पाऊस यापासून  बचाव होण्यासाठी आपल्या कंपनीच्या माध्यमातून व कंपनीने तयार केलेले कास्ता पाईप कंपनीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना तसेच पत्रकारांना  रेनकोट चे वाटप करण्यात आले आणि त्याचप्रमाणे 15 फोटो बाय 50 या आकाराची चटई मंदिर समितीला भेट देण्यात आली . याशिवाय वारकरी भाविक भक्तांना प्रसाद वितरणासाठी 50000 उच्च प्रतीच्या प्रसाद पिशव्या तसेच वारकरी संप्रदायाच्या नित्यपटनातील महत्त्वाच्या ग्रंथ असलेल्या हरिपाठाच्या 75 हजार प्रति मंदिर समितीला भेट स्वरूपात देण्यात आल्या याशिवाय पोलीस शासकीय कर्मचारी पत्रकार यांनाही उच्च प्रतीचे रेनकोट वाटप करण्यात आले या साहित्याचा मोठ्या प्रमाणात भाविकांना लाभ होणार असून यात्रेच्या व्यवस्थापनालाही यामुळे हातभार लागणार आहे कास्ता पाईप कंपनीकडून मार्केट हेड वैभव केळकर महाराष्ट्र सेल्स प्रमुख प्रदीप पैठणे तसेच तीन जिल्ह्याचे प्रमुख गोपाळ आदोणे हे उपस्थित होते यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अवसेकर महाराज तसेच सदस्य संभाजी शिंदे शकुंतला नडगिरे व अन्य संचालक मंडळ उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"