" आजी-माजी नेते मंडळींनी लोकांच्या हाताला काम न दिल्यामुळे लोकांना अतिक्रमण करून व्यवसाय करण्याशिवाय पर्याय राहिला नाही "..... दिगंबर सुडके उपाध्यक्ष जिल्हा सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस


 पंढरपूर.....

     नुकतीच आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमण व फुटपाथवर असलेले अतिक्रमण काढण्याचे नगरपालिका यांनी मोहीम राबवली आहे यामध्ये 30 ते 40 वर्ष बारीक सारीक खोके टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे असंख्य छोटे मोठे व्यापारी हे आज देशोधडीला लागले याची चित्र पंढरपूर शहरात सर्वत्र दिसून येत आहे. जगण्याचे साधनच पंढरपूर नगरपालिका अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केल्यामुळे या लोकांच्या मध्ये प्रचंड संताप व नैराश्य भरून राहिले आहे.

      पंढरपूर तालुक्यातील आजी-माजी राजकीय नेते मंडळींनी फक्त लोकांना औद्योगिक वसाहतीचे गाजर दाखवून आपली आमदारकी साजरी करत आले आहेत. पंढरपूर तालुक्यातील व शहरातील लोकांना हाताला रोजगार नसल्यामुळे आणि पंढरपूर शहरांमध्ये भरणाऱ्या चार यात्रेच्या जीवावर आपला प्रपंच ते कसाबसा करीत आहेत. कुठलीही एमआयडीसी नाही किंवा कुठलाही मोठा उद्योग या परिसरामध्ये नसल्यामुळे चार वारी च्या नंतर लोकांना जगण्याचे काही साधन नसते म्हणून ते नगरपालिकेच्या जागेमध्ये उपजीविकेचे साधन म्हणून लहान सांन खोकी टाकून ते आपला व्यापार धंदा सुरू करून उदरनिर्वाह करीत असतात अशा या गरजू व्यापाऱ्यांच्या जीवनामध्ये नगरपालिकेने व तसेच महाराष्ट्र शासनाने दुःखाचा डोंगर उभा केला आहे.

       पंढरपूर शहरामध्ये कॅरीडोर  होणार असल्यामुळे शहरातील सर्व रस्ते रुंद करण्याच्या उद्देशाने नगरपालिका व  शासन हे अतिक्रमण हटवत आहेत परंतु या अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याचे कुठलेही नियोजन शासनाने व नगरपालिकेने केलेले नाही किंवा तसा त्यांना शब्द दिलेला नाही या गोरगरीब व्यापाऱ्यांनी करायचे काय?हा जटिल प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या सर्व अतिक्रमण धारक व्यापाऱ्यांचे त्वरित पुनर्वसन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके यांनी आज केली.

     पंढरपूर शहरामध्ये परप्रांतीय असंख्य व्यापारी आपले हात गाडी घेऊन रस्त्यामध्ये वाहतुकीस अडथळा करीत आपला व्यवसाय करीत आहेत याच्याकडे नगरपालिकेचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. स्थानिकांना जगू द्यायचे नाही आणि परप्रांतीयांना जगू द्यायचे असे धोरण सद्यस्थितीला पंढरपूर शहरांमध्ये दिसून येत आहे.

    राजकीय नेते मंडळी हे आपापल्या नेत्यांच्या स्वागताच्या तयारीमध्ये लागलेले असून नेतेमंडळीचे मोठे बॅनर लावले जात आहेत परंतु या स्थानिक नेत्यांना पंढरपूर शहरांमधील या छोटे-मोठे व्यापाऱ्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही असे चित्र सध्या पंढरपूर शहरांमध्ये दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"