" दि मर्चंट बॅंक च्या वतीने युवा उद्योजक सन्मान सोहळा" स्थळ....दि पंढरपूर मर्चंटस को ऑप. बॅंक लि . पंढरपूर


 पंढरपूर ( प्रतिनिधी) शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी पंढरपूर शहरातील व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी ती पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक पंढरपूर यांच्या वतीने " युवा उद्योजक"मार्गदर्शन मेळावा व सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी 100 युवा उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे युवा उद्योजकांना उद्योगा साठी व आवश्यक असणारे मार्गदर्शन केले जाणार आहे.

    युवा उद्योजकांना दि.पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक येथील वि.औ.तथा बाबुराव म्हमाने सभागृह या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने सुरू केलेल्या विविध महामंडळाच्या माध्यमातून अर्थपुरवठा केला जातो याची माहिती आणि कोणकोणते आर्थिक विकास महामंडळ आहेत त्याची यादी पुढीलप्रमाणे आहे. 

   अण्णासाहेब पाटील आर्थिक महाविकास मंडळ, जगद् ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव आर्थिक विकास महामंडळ, संत सेनानी महाराज केश शिल्पी विकास महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ,स्व.विष्णूपंत रामचंद्र दादरे( लोणारी )आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ. असा विविध आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून युवा उद्योजकांना उद्योग धंद्यासाठी लघु उद्योगासाठी आर्थिक पुरवठा केला जातो त्याबाबतची माहिती व योग्य ते मार्गदर्शन हे या ठिकाणी मेळाव्यामध्ये केले जाणार आहे तरी युवा उद्योजकांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शवून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन अमरजीत राजाराम पाटील आणि व्हाईस चेअरमन विजयकुमार रामचंद्र परदेशी यांनी केले.

    या युवा उद्योजक मेळाव्या संदर्भा बाबतीत संपर्क रमेश कुलकर्णी फोन ( ९५५२६९४७७७), कैलास स्वामी, फोन ९९२३०७२७२९)संतोष मांडवे फोन(९९६०७५६१७१) या बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अशी माहिती दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व व्यवस्थापक अतुल म्हमाने यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"

"डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्ड ब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली "