" रायबा हेच का? आपले स्वराज्य " या महानाट्याचा कार्यक्रम पंढरपूर शहरात...
पंढरपूर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव च्या निमित्ताने पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध कर्नल भोसले चौक या ठिकाणी माननीय नागेश काका भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने रायबा हेच का आपले स्वराज्य या महानाट्याचा प्रयोग शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2020 रोजी होणार असून तमाम शिवप्रेमी यांनी या महानाट्याचा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि दूरदृष्टी या सर्वांगीण गुणांचा अविष्कार पाहण्याचा पंढरपूर शहरवासीयांना लाभ होणार आहे तरी पंढरपूर शहरातील आबाल वृद्ध करून तरुणी माता-भगिनी यांनी या महानाट्य पाहण्यास आवर्जून उपस्थिती दर्शवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील हे महानाट्य पाहण्याचा लाभ घ्यावा.
असे कर्नल भोसले चौक शिव जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी व सभासद यांनी माहिती दिली तरी हे महानाट्य पाहण्यास अवश्य यावे असे आवाहन करण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा