" मराठी पाऊल पडते पुढे"या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि चरित्र पोवाडे यांच्या माध्यमातून व्यक्त केले "..



 पंढरपूर ( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील संत पेठ परिसरातील प्रभाग क्रमांक 16 नगरसेविका माधुरी दिलीप धोत्रे आणि मनसेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या अथक प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र त्यांचे कार्य व विचार हे मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील बाल ,वयोवृद्ध तरुण तरुणींना एक प्रेरणादायी कार्यक्रम पाहण्याचा योग मनसेनेचे दिलीप बापू धोत्रे यांनी आणून दिला आहे. 

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या जीवनामधील विविध पराक्रम महाराजांची रणनिती,गणिमी कावा,स्वराज्याच्या स्थापने साठी केलेलें प्रयत्न आणि महाराजांनी  अठरापगड गोरगरीब क ष्टकरी शेतकरी माता भगिनी यांच्या साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाने जीवन जगण्याचा दिलेला मुलमंत्र आणि स्वराज्य रक्षणासाठी आणि त्याच्या वाढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य त्याचप्रमाणे महिलांच्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी केलेले कार्य हे जगभरातील इतिहासामध्ये नोंदले गेलेले आहे अशा या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांगीण कार्याचा लेखाजोखा मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज संतपटिया परिसरामधील माता-भगिनी तरुण-तरुणी आबाल वृद्ध या बांधवांच्यासाठी एक सुवर्णमय अशी पर्वणी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी या शिवजयंतीच्या निमित्ताने उपलब्ध करून दिली. 

    या कार्यक्रमास उपस्थित पंढरपूर शहराच्या नगराध्यक्ष सौ डॉ .प्रणिता ताई भालके त्याचप्रमाणे भगीरथ भालके ,नागेश काका भोसले, महेश नाना साठे ,मस्के मेंबर ,दिगंबर सुडके, नागेश यादव, लंकेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"