पोस्ट्स

ऑगस्ट, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

" लाडक्या बहिणी आणि रोंगे सरांच्या लाडक्या विद्यार्थीनी साठी नऊ मजली वस्तीगृह उभारून मुलींची राहण्याची सुविधा"...... पालकमंत्री जयकुमार गोरे

इमेज
 पंढरपूर.( प्रतिनिधी) ग्रामीण भागातील बहुजन समाजामधील भावी पिढीला शैक्षणिकदृष्ट्या प्रगत करण्याच्या उद्देशाने रोंगे सर यांनी गोपाळपूर सारख्या माळरानावर तंत्र शिक्षणाची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बहुजन समाजामधील असंख्य मुलांमध्ये या ठिकाणी उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहे.       मुलींचे पालक हे आपल्या मुलीला उच्च शिक्षणाची संधी व सुविधा उपलब्ध या ठिकाणी झाल्यामुळे कित्येक पालक हे आपल्या मुलीला उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने या स्वेरी या शिक्षण संकुलामध्ये दाखल करीत आहेत. या ठिकाणी डॉ. बीपी रोंगे सर यांनी मुलींच्या साठी नऊ मजली इमारत उभारून मुलींच्या राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे .त्यामुळे पालक कुठलीही चिंता न करता या ठिकाणी आपल्या मुलीला वस्तीगृह मध्ये ठेवत आहेत. मुलींची राहण्याची सोय झाल्यामुळे या ठिकाणी पाचशे ते सहाशे विद्यार्थिनींची राहण्याची, जेवणाची तसेच चहापाण्याची आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेली हे वसतिगृह डॉ. बीपी रोंगे सर यांनी चालू केल्यामुळे अनेक पालकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे. असे मनोगत अध्यक्ष स्थानावरून सोलापूर जिल्ह्याच...

"मनाच्या अस्वस्थते मधूनच नावीन्यपूर्ण उद्दिष्ट साकारले जात असते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉ. बी.पी रोंगे सर"...... उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) डॉ. बीपी रोंगे सर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने आपले उच्च शिक्षण मुंबई या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सोलापूर येथील वालचंद इंजीनियरिंग कॉलेज या ठिकाणी नोकरी करत असतानाच त्यांचे मन सर्वसामान्यांच्या मुला मुलींसाठी काहीतरी तंत्रशिक्षणामध्ये भव्य दिव्य उच्च शिक्षणाची संशोधनाची सोय व्हावी या उद्देशाने त्यांचे मन अस्वस्थ व्हायचे या मनाच्या अस्वस्थते ते मधूनच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वेरी या उच्च तंत्रज्ञान शिक्षण संकुलामध्ये उच्च शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिले आहेत या शैक्षणिक संकुलामध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग फार्मसी एमबीए तसेच लॉ कॉलेज अशा अनेक व्यावसायिक शिक्षणाला चालना देण्याचे काम या शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजामधील असंख्य मुलं मुली हे विविध कंपन्या मधून कामाला लागतील आणि पुढील पिढीला एक आदर्श निर्माण करून देतील या उद्देशाने डॉक्टर बीपी रोंगे सरांनी हे ज्ञानदानाचे मंदिर उभा केले आहे. असे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज रोजी स्वेरी या महाविद्यालयामध्ये मुलींच्या साठी ९...

" तीन देव माणसांच्या मुळे स्वेरी शिक्षण संकुल उभे राहिले".... डॉ.बी.पी.रोंगे सर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). सर्वसामान्य बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातील मुला मुलींच्या साठी उच्च तंत्रज्ञान शिक्षण आपल्या पंढरपूर तालुक्या मध्ये मिळायला हवे या विचाराने आम्ही काही प्राध्यापक सहकारी मित्रांनी गोपाळपूरच्या या माळावर स्वेरी या उच्च तंत्रज्ञान अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली या महाविद्यालयाला आम्हाला देव माणसांची भेट झाली. ही देव माणसे म्हणजे कै. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक तसेच माजी तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे सर यांच्या सहकार्यामुळे व मदतीमुळे या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाला परवानगी मिळवून देण्याच्या कामी माजी तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांनी मोलाचे सहकारी केले.      स्वेरी हे अभियांत्रिकी महाविद्यालय 13000 स्क्वेअर फुटामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आले. 160 विद्यार्थी यांना घेऊन व आठ प्राध्यापकांच्या मदतीने व दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले या लहानशा रोपट्याचे आज मो...

"उद्या स्वेरी लाॅ काॅलेज व नवीन बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते "

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यांमध्ये उच्च शिक्षणाच्या उज्वल वाटा निर्माण करण्याचे काम डॉ. बी .पी. रोंगे सर केले आहे. गोपालपुर सारख्या माळावर उच्च शिक्षणाचे व तंत्रशिक्षणाचे दणदणमन फुलवण्याचे काम डॉक्टर बीपी रोंगे सर यांनी केले यांच्या या शैक्षणिक कार्याला संपूर्ण महाराष्ट्र मधून प्रतिसाद मिळत गेला सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी बोल मजुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना क्षणाचे दादन सुरू करून त्यांनी बहुजन समाजातील असंख्य मुला मुलींना उच्च शिक्षण प्राप्त करून देण्याचे काम केले आहे.      स्वेरी या शैक्षणिक संस्थेमध्ये डॉक्टर रोंगे सरांनी लॉ कॉलेज सुरू करून कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांची पुढील शिक्षणाची सोय त्यांनी सुरू केली आहे. बी फार्मसी डी फार्मसी त्याचप्रमाणे डिप्लोमा इंजीनियरिंग डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करून असंख्य विद्यार्थ्यांना भारतभरामध्ये तसेच परदेशामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. विविध कंपन्यांचे कॅम्पस भरवून या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे.     अशा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीपथावर असलेली नामक...

"आमदार झाल्यानंतर अधिवेशनात मराठा आरक्षणावर आवाज उठवला"... आमदार अभिजीत आबा पाटील

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघातील आमदार म्हणून आणि पंढरपूर तालुक्यातील रहिवासी असल्याने मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर मराठा आरक्षणावर मराठा समाजाची बाजू मांडून लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा अशी मागणी केली.असे आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मराठा बांधव मुंबई घ्या दिशेने मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा बांधव मुंबई कडे निघाले तेव्हा त्यांच्या सोबत आमदार अभिजीत आबा पाटील हे देखील निघाले आहेत.त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.        महाराष्ट्र शासनाने लवकरच विशेष अधिवेशन बोलवावे आणि त्यामध्ये मराठा बांधवांना अपेक्षीत असलेले आरक्षण शासनाने द्यावे.ऐन सणासुदीच्या काळामध्ये मराठा बांधवांना मुंबई च्या दिशेने यावे लागते.हे अपेक्षित नाही.शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा.मराठा आरक्षणासाठी आम्ही सर्व मुंबई कडे निघालो आहोत.असे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले.     यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले व हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

"लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे शुभारंभ" सौ.शुभांगी व श्री रमेश राव देशमुख यांच्या शुभहस्ते उद्घाटन

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध नामांकित हॉस्पिटल म्हणून ओळखले जाणारे लाईफ लाईन  सुपर स्पेशलिटी या हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या रोगावरील निदान व चाचण्या या लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. या वैद्यकीय क्षेत्रातील विविध सेवा, रोग उपचार, निदान या सेवा डॉ. देशमुख हे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये आज अत्याधुनिक सेवेच्या माध्यमातून आज रोजी नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन सौ शुभांगी व रमेश राव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.      डॉ.विश्वजित देशमुख यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले..मी मुंबईला सायन हॉस्पिटल येथे एमबीबीएस पदवी घेतली त्यानंतर मदुराई येथे पुढील वैद्यकीय शिक्षण घेतले.हैद्राबाद येथील एल.व्ही. प्रसाद काॅलेज येथे नेत्ररोग उपचार पद्धती व अद्ययावत तंत्रज्ञान चे कौशल्य व शिक्षण प्राप्त केले. हैदराबाद येथील एल.व्ही. प्रसाद कॉलेजमधून नेत्र रोगाच्या संदर्भातील सर्व निदान व उपचार पद्धती या आत्मसात केलेल्या आहेत. आणि डोळ्यांचे बुबळ बदलणे त्याचप्रमाणे मोतीबिंद ,काचबि...

"लाईफ लाईन हाॅस्पिटल येथे अत्याधुनिक नेत्रसेवा विभाग शुभारंभ" .... डॉ.विश्वजित देशमुख.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील नामवंत आणि वैद्यकीय सेवेमध्ये  अग्रगण्य असलेले लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हे ओळखले जाते .    या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रोग उपचार यंत्रणा व वैद्यकीय सुविधा या उपलब्ध आहेत. या वैद्यकीय सुविधेमध्ये अजून एक वाढ म्हणून नेत्र रोगावरील विविध उपचार यंत्रणा व उपचार हा अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची डोळ्याच्या आजाराचे सर्व निदान व उपचार हे केले जाणार आहेत.      दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दहा वाजता या अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे शुभारंभ श्री व सौ रमेश देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक भाजपाचे आमदार समाधान आवताडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वसंत नाना ...

" कॅरिडॉर बाधीतांचा कंठ दाटून आला"

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी). गेली काही वर्षांपासून पंढरपूर येथे श्रीविठ्ठल मंदीर परिसरामध्ये वारकरी भाविक भक्तांच्या सोयीसाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने पंढरपूर येथे कॅरिडाॅर उज्जैन वाराणसीच्या धर्तीवर बनवणार हे जाहीर केल्यापासून मंदीर परिसरामधील बाधीतांची मानसिक स्वास्थ बिघडून गेले आहे.पंढरीचा विकास आणि आम्ही भकास अशी अवस्था या बाधीतांची झाली आहे.      पर्यायी जागा,दुकाने, अणि भरमसाठ पैसे दिले जाणार अशी शासनाची भूमिका असल्याचे समजते.परंतू ऐन गावातील घरजागा,वाडे,दुकाने,मठ आदी नामशेष होण्याच्या भीतीने बाधीतांची अवस्था दयनीय झाली आहे.या भागातील जुन्या आठवणी,शेजारी,श्री विठूराया चे सानिध्य हे सर्व विसरावे लागणार आहे.    महाराष्ट्र शासन मोबदला देईल परंतु या मोबदल्याची वाटणी करताना या बाधीतांची दमछाक होणार आहे.काही बाधीत लोक आता या पुढे काय करायचे या विवंचनेत आहेत. तर काही बाधीत उपनगरांमध्ये स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत.पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राहण्याच्या विचारात काही लोक आहेत.     कायमस्वरूपी या भागातून विस्थापित व्हावे लागणार आहे या विचाराने या बाधीतां...

"आमदार अभिजीत आबा पाटील यांचे शरद पवारांनी केले कौतुक "... अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये अभ्यासपूर्ण प्रश्नांनी शरद पवार भारावले.

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या कारखान्याचे संचालक मंडळ व धाराशिव  साखर कारखाना यांच्या संचालक मंडळांनी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली.       याप्रसंगी शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगीण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली ऊस केळी द्राक्ष डाळिंब केळी ए आय संशोधन यावर सविस्तर चर्चा करून पवार साहेबांनी या संचालक मंडळाला मार्गदर्शन केले.      श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माढा तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार अभिजीत आबा पाटील यांच्याशी शरद पवार यांनी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधला असता माढा तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी केले असंख्य प्रश्न विचारून अभ्यासपूर्ण भाषण अभिजीत आबा पाटील यांनी केल्यामुळे शरद पवार यांनी अभिजीत आबा पाटील यांच्या अभ्यासपूर्ण प्रश्नावली ला दाद देत शरद पवार यांनी अभिजीत आबा पाटील यांचे कौतुक केले.      यावेळी या संचालक मंड...

"मा.नागेश काका भोसले आणि किरण आप्पा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे उद्घाटन " शिवसेना नेते महेश साठे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन ही केले आणि रक्तदान ही केले.....

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील नामवंत चौक म्हणून ओळखला जाणारा कर्नल भोसले चौक तरुण मंडळ या मंडळाच्या वतीने आज रोजी माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले तसेच सकल मराठा समाज चे अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर कर्नल भोसले चौक या ठिकाणी असलेले गणपती मंदिर येथे रक्तदान शिबिर पार पडले.        या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना ( शिंदे गट)संपर्कप्रमुख  महेश नाना साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महेश नाना साठे यांनी या शिबिराचे उद्घाटन देखील केले आणि रक्तदान देखील त्यांनी केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आणि रक्तदान करून रक्तदान या शिबिराला सहकार्य करण्याचा योग आज महेश नाना साठे यांनी जुळवून आणला.       माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले आणि सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली सातत्याने हे कर्नल भोसले चौक तरुण मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर आबा भोसले व संभाजी काका ...

मा.आमदार गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व आणि बुद्धीबळ स्पर्धा आयोजित.... तीन गटात स्पर्धा आयोजित.

इमेज
 पंढरपूर प्रतिनिधी: मा. आ.स्व.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महूद बु ता.सांगोला येथील देव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने फीनिक्स प्राथमिक मराठी, सेमी इंग्रजी माध्यम आणि ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन्ही स्पर्धा मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फीनिक्स संकुलात होणार आहेत. बुद्धिबळ स्पर्धेसाठी '१ ली ते ४ थी' आणि '५ वी ते खुला गट' असे दोन गट असून, दोन्ही गटांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. ३००१/-, रु. २००१/- आणि रु. १००१/- अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी आपला स्वतःचा बुद्धिबळाचा पट सोबत आणणे आवश्यक आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी 'मा. आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांचे चरित्र' हा विषय निश्चित करण्यात आला आहे. यासाठी '१ ली ते ४ थी', '५ वी ते ८ वी' आणि '९ वी ते १२ वी खुला गट' असे तीन गट आहेत. '१ ली ते ४ थी' गटासाठी वेळेची मर्यादा ४ मिनिटे असून, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. ७०१/-, रु. ५०१/- आणि...

"तृतीयपंथींना पंढरपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात कामाची संधी उपलब्ध करून देण्याचे मुख्याधिकारी यांनी दिले आश्वासन"..... भाजपा नेते माऊली हळणवर

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) समाजामध्ये तृतीयपंथी लोकांना कुठेही कामाची संधी मिळत नाही त्याचप्रमाणे त्यांना समाज स्वीकारत नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा या तृतीयपंथी बांधवांना आपले हक्काचे घर मिळावे ,आधार कार्ड मिळावे, रेशनिंग कार्ड मिळावे आणि आपल्या हाताला काम मिळावे. अशी अपेक्षा मनामध्ये घेऊन ही तृतीयपंथी लोक भाजपाचे नेते माऊली हळणवर यांच्याकडे आपली कैफियत मांडल्यानंतर माऊली हळणवर यांनी मध्यंतरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घडवून दिली त्यावेळी पालकमंत्री यांनी वरील सोयी सुविधा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. याचा पाठपुरावा माऊली हळणवर, तसेच रिपाईचे नेते दीपक आबा चंदनशिवे पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शिरसाट व विक्रम शिरसाट यांच्या प्रयत्नाने आज पंढरपूर नगरपालिका चे मुख्य अधिकारी रोकडे साहेब यांना या तृतीय पंथीयांच्या साठी पंतप्रधान घरकुल योजने मधून घर मिळावे तसेच रेशनिंग कार्ड मिळावे, आधार कार्ड मिळावे, त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार मिळावा आणि आपल्या हाताला काम मिळावे अशा मागण्या त्यांनी मुख्याधिकारी रोकडे यांना निवेदन देऊन आपले मनोगत...

"नो कॅरिडाॅर.......नो डी.पी.प्लॅन" पंढरपूर येथील बाधीत होणाऱ्या भागातील महिलांचा प्रचंड विरोध

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चित असलेले महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र पंढरपूर या विठुरायाच्या नगरीमध्ये केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार हे पंढरपूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी म्हणून मोठे रस्ते तसेच विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाराणसी तसेच उज्जैन या शहराच्या धर्तीवर हे कॅरिडॉर आराखडा राबवण्यात येणार असल्याचे शासन सांगत आहे.      या कॅरिडोरला व डीपी रस्त्यांना मंदिर परिसरातील हजारोच्या संख्येने राहणारे रहिवाशी, दुकानदार व मठाधिपती यांचा यांचा विरोध वेळोवेळी त्यांनी दर्शवलेला आहे. विरोध म्हणून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. तसेच लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन हे मतदान कॅरिडरच्या विरोधातील होते .असे विविध पद्धतीने निषेध व्यक्त करून देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॅरीडोर आराखडा राबवीत आहे. याला विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने आज पंढरपूर शहरातील मंदिर परिसरामधील भागात राहणाऱ्या शेकडो महिलांनी आज पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या कॅरिडॉरचा निषेध व्यक्त केला.    ...

"पै.माऊली काळे यांच्या पक्ष प्रवेशाने नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला लाभ होईल " अनिल सावंत

इमेज
 पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर शहरातील नामवंत पैलवान माऊली आबा काळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षामध्ये अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांमध्ये आज रोजी प्रवेश केला. पैलवान माऊली आबा काळे यांच्या समवेत असंख्य तरुणांनी आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पंढरपूर या पक्षाला पंढरपूर व तालुका मधून पक्षाला बळकटी देण्याचे कार्य होणार आहे. येत्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाला पैलवान माऊली काळे व गंगेकर बंधू यांच्यामुळे पक्षाला लाभ होणार आहे. असे मनोगत अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते यांनी व्यक्त केले.       येणाऱ्या पंढरपूर नगरपालिका तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद अशा विविध निवडणुकांमध्ये पै.माऊली काळे व गंगेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा मोठा  करण्यास मदत करतील. अशी अपेक्षा देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत यांनी व्यक...