"आमदार झाल्यानंतर अधिवेशनात मराठा आरक्षणावर आवाज उठवला"... आमदार अभिजीत आबा पाटील
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा विधानसभा मतदारसंघातील आमदार म्हणून आणि पंढरपूर तालुक्यातील रहिवासी असल्याने मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर मराठा आरक्षणावर मराठा समाजाची बाजू मांडून लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा अशी मागणी केली.असे आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मराठा बांधव मुंबई घ्या दिशेने मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा बांधव मुंबई कडे निघाले तेव्हा त्यांच्या सोबत आमदार अभिजीत आबा पाटील हे देखील निघाले आहेत.त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाने लवकरच विशेष अधिवेशन बोलवावे आणि त्यामध्ये मराठा बांधवांना अपेक्षीत असलेले आरक्षण शासनाने द्यावे.ऐन सणासुदीच्या काळामध्ये मराठा बांधवांना मुंबई च्या दिशेने यावे लागते.हे अपेक्षित नाही.शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा.मराठा आरक्षणासाठी आम्ही सर्व मुंबई कडे निघालो आहोत.असे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले व हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा