मा.आमदार गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व आणि बुद्धीबळ स्पर्धा आयोजित.... तीन गटात स्पर्धा आयोजित.
पंढरपूर प्रतिनिधी: मा. आ.स्व.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महूद बु ता.सांगोला येथील देव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने फीनिक्स प्राथमिक मराठी, सेमी इंग्रजी माध्यम आणि ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन्ही स्पर्धा मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फीनिक्स संकुलात होणार आहेत.
बुद्धिबळ स्पर्धेसाठी '१ ली ते ४ थी' आणि '५ वी ते खुला गट' असे दोन गट असून, दोन्ही गटांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. ३००१/-, रु. २००१/- आणि रु. १००१/- अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी आपला स्वतःचा बुद्धिबळाचा पट सोबत आणणे आवश्यक आहे.
वक्तृत्व स्पर्धेसाठी 'मा. आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांचे चरित्र' हा विषय निश्चित करण्यात आला आहे. यासाठी '१ ली ते ४ थी', '५ वी ते ८ वी' आणि '९ वी ते १२ वी खुला गट' असे तीन गट आहेत. '१ ली ते ४ थी' गटासाठी वेळेची मर्यादा ४ मिनिटे असून, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. ७०१/-, रु. ५०१/- आणि रु. ३०१/- अशी बक्षिसे आहेत. '५ वी ते ८ वी' गटासाठी ५ मिनिटे आणि '९ वी ते १२ वी खुला गट' यासाठी ७ मिनिटे वेळ दिला जाईल. या दोन्ही गटांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु. ३००१/-, रु. २००१/- आणि रु. १००१/- अशी बक्षिसे आहेत. स्पर्धकांना आपले भाषण एका कागदावर लिहून आणणे बंधनकारक आहे.
या स्पर्धांमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सोमवार, दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपली नावे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी ९७६७५८३५३०, ७५८८०५०७२२, ९६५७६४६६४७, ९५२७५३२३८२ या क्रमांकांवर संपर्क साधावा. मागील वर्षी प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांना यावर्षी सहभागी होता येणार नाही, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा