"उद्या स्वेरी लाॅ काॅलेज व नवीन बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन नामदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते "


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यांमध्ये उच्च शिक्षणाच्या उज्वल वाटा निर्माण करण्याचे काम डॉ. बी .पी. रोंगे सर केले आहे. गोपालपुर सारख्या माळावर उच्च शिक्षणाचे व तंत्रशिक्षणाचे दणदणमन फुलवण्याचे काम डॉक्टर बीपी रोंगे सर यांनी केले यांच्या या शैक्षणिक कार्याला संपूर्ण महाराष्ट्र मधून प्रतिसाद मिळत गेला सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी बोल मजुरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना क्षणाचे दादन सुरू करून त्यांनी बहुजन समाजातील असंख्य मुला मुलींना उच्च शिक्षण प्राप्त करून देण्याचे काम केले आहे. 
    स्वेरी या शैक्षणिक संस्थेमध्ये डॉक्टर रोंगे सरांनी लॉ कॉलेज सुरू करून कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांची पुढील शिक्षणाची सोय त्यांनी सुरू केली आहे. बी फार्मसी डी फार्मसी त्याचप्रमाणे डिप्लोमा इंजीनियरिंग डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करून असंख्य विद्यार्थ्यांना भारतभरामध्ये तसेच परदेशामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. विविध कंपन्यांचे कॅम्पस भरवून या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे.
    अशा शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीपथावर असलेली नामक त्यांची शैक्षणिक संस्था मुलींच्या साठी नऊ मजली वस्तीग्रह नियोजन केलेले आहे त्याची पायाभरणी व भव्य असे असलेले क्रीडांगणाचे उद्घाटन दिनांक 31 ऑगस्ट रविवार रोजी  स्वेरी कॉलेज या ठिकाणी व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आहेत. 
    या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताडे, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे, सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर देशमुख, सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील, विधान परिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक, माळशिरस तालुक्याची माजी आमदार सातपुते आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. पंढरपूर सर्व ग्रामीण भागातील मान्यवरांनी उपस्थित रहावे. असे आग्रहाचे निमंत्रण श्री कॉलेजचे प्रमुख प्राध्यापक डॉ. बी पी रोंगे यांनी दिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....