"पै.माऊली काळे यांच्या पक्ष प्रवेशाने नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला लाभ होईल " अनिल सावंत
पंढरपूर ( प्रतिनिधी ) पंढरपूर शहरातील नामवंत पैलवान माऊली आबा काळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षामध्ये अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांमध्ये आज रोजी प्रवेश केला. पैलवान माऊली आबा काळे यांच्या समवेत असंख्य तरुणांनी आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पंढरपूर या पक्षाला पंढरपूर व तालुका मधून पक्षाला बळकटी देण्याचे कार्य होणार आहे. येत्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाला पैलवान माऊली काळे व गंगेकर बंधू यांच्यामुळे पक्षाला लाभ होणार आहे. असे मनोगत अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते यांनी व्यक्त केले.
येणाऱ्या पंढरपूर नगरपालिका तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद अशा विविध निवडणुकांमध्ये पै.माऊली काळे व गंगेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा मोठा करण्यास मदत करतील. अशी अपेक्षा देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत यांनी व्यक्त केली.
येत्या काही दिवसातच पक्षाचे ज्येष्ठ नेते सुप्रियाताई सुळे तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून पैलवान माऊली काळे यांना मोठे पद मिळणार असून या पदाचा पैलवान माऊली काळे यांची पक्ष वाढीसाठी त्यांची मदत होणार आहे. लवकरच पैलवान माऊली काळे यांना मोठे पद दिले जाणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि सावंत यांनी पैलवान माऊली काळे व गंगेकर बंधू व असंख्य कार्यकर्ते यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षांमध्ये प्रवेश करतेवेळी अनिल सावंत यांनी ही माहिती दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा