"लाईफ लाईन हाॅस्पिटल येथे अत्याधुनिक नेत्रसेवा विभाग शुभारंभ" .... डॉ.विश्वजित देशमुख.
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील नामवंत आणि वैद्यकीय सेवेमध्ये अग्रगण्य असलेले लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हे ओळखले जाते .
या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रोग उपचार यंत्रणा व वैद्यकीय सुविधा या उपलब्ध आहेत. या वैद्यकीय सुविधेमध्ये अजून एक वाढ म्हणून नेत्र रोगावरील विविध उपचार यंत्रणा व उपचार हा अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची डोळ्याच्या आजाराचे सर्व निदान व उपचार हे केले जाणार आहेत.
दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दहा वाजता या अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे शुभारंभ श्री व सौ रमेश देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक भाजपाचे आमदार समाधान आवताडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते वसंत नाना देशमुख जयसिंग देशमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख डॉक्टर ऋतुजा डॉक्टर अमरसिंह जमदाडे डॉक्टर अमित कुमार आजबे यांच्यासह लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टर कोलपकवार, डॉक्टर प्रवीण वायकुळे डॉ पौरवी शिंदे, डॉ.शुभम शिंदे, डॉ.श्रध्दा देशमुख, डॉ.बेलदार डॉ.संजय देशमुख, डॉ.राहुल राठोड आदी उपस्थित राहणार आहेत. या आत्याधुनिक नेत्रसेवा विभागाच्या शुभारंभासाठी लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ देशमुख यांनी केले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा