"लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचे शुभारंभ" सौ.शुभांगी व श्री रमेश राव देशमुख यांच्या शुभहस्ते उद्घाटन


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध नामांकित हॉस्पिटल म्हणून ओळखले जाणारे लाईफ लाईन  सुपर स्पेशलिटी या हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या रोगावरील निदान व चाचण्या या लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. या वैद्यकीय क्षेत्रातील विविध सेवा, रोग उपचार, निदान या सेवा डॉ. देशमुख हे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये आज अत्याधुनिक सेवेच्या माध्यमातून आज रोजी नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन सौ शुभांगी व रमेश राव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

     डॉ.विश्वजित देशमुख यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले..मी मुंबईला सायन हॉस्पिटल येथे एमबीबीएस पदवी घेतली त्यानंतर मदुराई येथे पुढील वैद्यकीय शिक्षण घेतले.हैद्राबाद येथील एल.व्ही. प्रसाद काॅलेज येथे नेत्ररोग उपचार पद्धती व अद्ययावत तंत्रज्ञान चे कौशल्य व शिक्षण प्राप्त केले. हैदराबाद येथील एल.व्ही. प्रसाद कॉलेजमधून नेत्र रोगाच्या संदर्भातील सर्व निदान व उपचार पद्धती या आत्मसात केलेल्या आहेत. आणि डोळ्यांचे बुबळ बदलणे त्याचप्रमाणे मोतीबिंद ,काचबिंदू व अन्य नेत्ररोगा चे ज्ञान त्या ठिकाणी मिळाले. आपल्या पंढरपूर शहरांमध्ये नेत्ररोगाच्या उपचार पद्धती मध्ये अत्याधुनिक पद्धतीची वैद्यकीय उपचार यंत्रणा वापरायचे ठरवले व ती यंत्रसामुग्री आम्ही या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये आणलेली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञांच्या माध्यमातून व यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर शहर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील रुग्णांना ही सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ही  नेत्रसेवा आम्ही करणार आहोत. असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. 

    मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये जाऊन रुग्ण सेवा करण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना डोळ्याच्या उपचाराचे व नेत्र रोगाचे त्यावर उपचार व निदान व्हावे यासाठी पंढरपूर याच ठिकाणी ही वैद्यकीय सेवा सुरू  करावी. अशी आई-वडिलांच्या इच्छे मुळे मी या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे. असे डॉ. विश्वजीत देशमुख यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. 

      डॉ.संजय देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये डॉ .विश्वजित देशमुख यांचे वैद्यकीय शिक्षण तसेच त्यांनी नेत्ररोग याविषयी सखोल ज्ञान प्राप्त केलेले आहे. याचा लाभ आपल्या पंढरपूर तालुक्यातील व अन्य तालुक्यातील लोकांना होणार आहे. कासेगाव चे देशमुख म्हटले की ऊस बागायतदार, द्राक्ष बागायतदार, डाळिंब बागायतदार, बोर बागायतदार, व राजकारणी म्हणून ओळखले जाते. परंतु या पुढील काळामध्ये या पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील देशमुख यांना डॉक्टरांचे कासेगाव म्हणून जास्तीत जास्त  ओळखले जावे. अशी मनोभावना व्यक्त करून त्यांनी डॉक्टर विश्वजीत देशमुख यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 

    या कार्यक्रमास उपस्थित म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक, जयसिंग नाना देशमुख, वसंत नाना देशमुख डॉ. सौ व श्री संजय देशमुख डॉक्टर वायकुळे व सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील व असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....