" कॅरिडॉर बाधीतांचा कंठ दाटून आला"
पंढरपूर ( प्रतिनिधी). गेली काही वर्षांपासून पंढरपूर येथे श्रीविठ्ठल मंदीर परिसरामध्ये वारकरी भाविक भक्तांच्या सोयीसाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने पंढरपूर येथे कॅरिडाॅर उज्जैन वाराणसीच्या धर्तीवर बनवणार हे जाहीर केल्यापासून मंदीर परिसरामधील बाधीतांची मानसिक स्वास्थ बिघडून गेले आहे.पंढरीचा विकास आणि आम्ही भकास अशी अवस्था या बाधीतांची झाली आहे.
पर्यायी जागा,दुकाने, अणि भरमसाठ पैसे दिले जाणार अशी शासनाची भूमिका असल्याचे समजते.परंतू ऐन गावातील घरजागा,वाडे,दुकाने,मठ आदी नामशेष होण्याच्या भीतीने बाधीतांची अवस्था दयनीय झाली आहे.या भागातील जुन्या आठवणी,शेजारी,श्री विठूराया चे सानिध्य हे सर्व विसरावे लागणार आहे.
महाराष्ट्र शासन मोबदला देईल परंतु या मोबदल्याची वाटणी करताना या बाधीतांची दमछाक होणार आहे.काही बाधीत लोक आता या पुढे काय करायचे या विवंचनेत आहेत. तर काही बाधीत उपनगरांमध्ये स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत.पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राहण्याच्या विचारात काही लोक आहेत.
कायमस्वरूपी या भागातून विस्थापित व्हावे लागणार आहे या विचाराने या बाधीतांची मानसिक अवस्था शोचनीय झाली आहे.शासन पैसा देईल परंतु हा पैसा बघता बघता संपून जाईल.या पैशाचे करायचं काय हा देखील प्रश्न काहींना सतावत आहे.
काही बाधीतांनी आपल्या कित्येक पीढ्या याठिकाणी वावरल्या आहेत.हा भाग सोडून अन्यत्र जाण्याची मानसिकता तयार होईना.या भागातील आठवणी,शेजारी असलेले रहिवासी लोक ,शेजारधर्म म्हणून जपलेली माणुसकी,एकमेकांचा प्रेमळ सहवास या सर्व सुखाला आपण या पुढे मुकणार आहोत.या कल्पनेने या कॅरीडोर बाधितांचा कंठ दाटून येऊ लागला आहे.
आपल्या वाडवडिलांची मिळकत ,पुरातन वाडे,खांडेदांडयाची खताची घरे,ओसरी,तळघर या सर्व नामशेष होणार आहे.या जाणीवेने त्यांच्या मनाची घालमेल होत आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नुकतेच सांगितले आहे.की येत्या आषाढी वारी पर्यंत हा कॅरिडॉर पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे या ठिकाणी बाधीतांची भावना गुंतलेल्या असल्याने त्यांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.पण.....विकासकामा पुढे सर्वकाही शून्यवत झाले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा