"मा.नागेश काका भोसले आणि किरण आप्पा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे उद्घाटन " शिवसेना नेते महेश साठे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन ही केले आणि रक्तदान ही केले.....
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील नामवंत चौक म्हणून ओळखला जाणारा कर्नल भोसले चौक तरुण मंडळ या मंडळाच्या वतीने आज रोजी माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले तसेच सकल मराठा समाज चे अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर कर्नल भोसले चौक या ठिकाणी असलेले गणपती मंदिर येथे रक्तदान शिबिर पार पडले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना ( शिंदे गट)संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महेश नाना साठे यांनी या शिबिराचे उद्घाटन देखील केले आणि रक्तदान देखील त्यांनी केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आणि रक्तदान करून रक्तदान या शिबिराला सहकार्य करण्याचा योग आज महेश नाना साठे यांनी जुळवून आणला.
माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले आणि सकल मराठा समाजाचे अध्यक्ष किरण आप्पा भोसले यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली सातत्याने हे कर्नल भोसले चौक तरुण मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर आबा भोसले व संभाजी काका भोसले. उद्योजक गणेश मलपे, दत्ता जाधव सर, शैलेश भाऊ भोसले, विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले, प्रसाद दादा भोसले, मुजावर सर यांच्या अथक प्रयत्नातून हे रक्तदान शिबिर पार पडले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना शिंदे गट शहर युवा नेते विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी केले होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा