" पंढरपूर नगरपालिकेने सुरू केली शहरभरातील स्वच्छता "


 पंढरपूर ( प्रतिनिधी ) नुकतीच तीर्थक्षेत्र पंढरी नगरीतील विठुरायाची आषाढी यात्रा पार पडली. लाखोच्या संख्येने विठुरायाच्या नगरीमध्ये वारकरी भावीक भक्त येऊन गेले. पंढरपूर नगरपालिकेने वारकरी भावीक भक्तांच्या साठी सर्व सुख सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. या सुखसोयी मध्ये सर्वात महत्वाची म्हणजे स्वच्छता मोहीम ही स्वच्छता मोहीम पंढरपूर नगरपालिकेने त्वरित संपूर्ण शहरातील केर कचरा हा गोळा करण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेले असून पंढरपूर शहर हे आता हळूहळू स्वच्छ होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. 

    पंढरपूर शहरातील मंदिर परिसर, शिवाजी चौक, चौफाळा, स्टेशन रोड, संत पेठ, कोळी गल्ली, 65 एकर परिसर रिद्धी सिद्धी येथील प्रदक्षिणा शेड ,व उपनगरे या संपूर्ण परिसरामध्ये नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेची मोहीम सुरू झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे पंढरपूर शहरातील रहिवासी नागरिक नगरपालिकेचे कौतुक करीत असून अशीच स्वच्छता वर्षभर सदैव राहावी अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"