"मैं मुस्लीम हूॅं,तू हिंदू है आवो तुम कुराण पढलो मैं गीता पढ लूॅं" असा हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश....
पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील कोर्टी या गावी पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जस्ने ईद-ए-मिलाद ची भव्य मिरवणूक आज रोजी काढण्यात आली.
यावेळी कोर्टी गावातील ग्रामस्थांनी हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून" मै मुस्लिम है
तू हिंदू है
आवो तुम कुराण पढलो
मै गीता पढलूॅं "असा हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश कोर्टी गावातील हिंदू मुस्लिम बांधवांनी आज रोजी पैगंबर जयंतीच्या निमित्ताने भव्य अशा मिरवणुकी मधून एक हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात आला. या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने कोर्टी गावातील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील बांधवांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये पैगंबर जयंती साजरी करण्यात आली.
पैगंबर जयंतीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील भाजपाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी यावेळी येऊन कोर्टी गावातील मुस्लिम बांधवांना पैगंबर जयंतीचे निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवशंभु प्रतिष्ठानचे महेश शेडगे त्याचप्रमाणे कोर्टी गावाचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे के जी एन ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते हे उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा