"कुस्तीगीरांच्या अडीअडचणी आखाड्यात येण्या आधी दिलीप बापू नी सोडवल्या"- मनसे नेते अमीत ठाकरे


 पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मंगळवेढा येथे मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी येथे मनसेच्या वतीने भरवलेल्या मनसे केसरी या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन अमित राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

     या प्रसंगी ब़ोलत असताना अमीत ठाकरे म्हणाले, पंढरपूर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील कुस्तीगीर यांच्या काही अडचणी समस्या या जाणून घेऊन त्याचप्रमाणे या दोन्ही तालुक्यातील असंख्य तालमींच्या बाबतीत काही अडी अडचणी व तालीमी मधील सुविधा त्याचप्रमाणे या तालमींना आर्थिक मदत व सुधारणा या करण्याच्या उद्देशाने कुस्तीगीरांच्या  काही अपेक्षित अशा या मागण्या या पूर्ण करण्याच्या व सोडवण्याचा प्रयत्न दिलीप बापू धोत्रे यांनी केलेला आहे. आणि त्याला यश देखील आले आहे . कुस्तीगीरां च्या अडचणी कुस्तीगीर आखाड्यात येण्याअगोदर दिलीप बापूंनी त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या. असे अमीत राज ठाकरे यांनी आज या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

      पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेच्या वतीने दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर झाली. आणि आज रोजी मनसे या पक्षाच्या वतीने दिलीप बापू धोत्रे यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये एक उत्साहाची लाट तरुणांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आज दिसून आले. हजारोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व युवा तरुण वर्ग हा या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी  होण्यासाठी व त्याचप्रमाणे या कुस्त्या पाहण्यासाठी आलेले होते.

    संपूर्ण मंगळवेढा शहर हे मनसेमय झाल्याचे आज चित्र दिसत होते. अमित राज ठाकरे यांचे आगमन मंगळवेढा शहरात होताच जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. 

      यावेळी उपस्थित मनसेचे असंख्य मान्यवर नेते व कार्यकर्ते हे उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....