"भाजपा उमेदवार राम सातपुते यांचा सोलापूर शहर मध्य या भागात झंझावात "
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापूर शहरांमधील शहर मध्य या भागामध्ये आज रोजी आपल्या प्रचाराचा झंजावात दौरा केला.
यावेळी शहर मध्य परिसरामध्ये असलेला भाग कोल्हापुरे चाळ, काडादी चाळ, तेलंगी पाच्छापेठ अशा या मध्य भाग हा प्रणिती ताई शिंदे यांचा हा भाग मानला जातो. या शहर मध्य मधून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना लोकांच्याकडून व त्या परिसरातील महिला, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत असल्याचे आज चित्र दिसून आले.
सोलापूर शहर मध्ये या भागामध्ये राम सातपुते यांचा झंजावात पाहता या परिसरातील सर्वसामान्य जनता प्रणिती ताई यांना डावलून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा देणार की काय? असे चित्र सध्या या सोलापूर शहर मध्ये परिसरामध्ये दिसून येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा