"पाच वर्षांतून पहिल्यांदाच जनतेला शुभेच्छा मिळू लागल्या" भावी खासदारांना आताच कसा उमाळा येऊ लागला.?
पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील पंचवार्षिक निवडणूक या जाहीर झाल्या आहेत .या निवडणुका जाहीर झाल्यापासून आजी-माजी आणि भावी खासदारांना जनतेची आठवण येऊ लागली आहे. जनतेच्या कामाची गोडी लागल्याने गल्लीतून दिल्लीत गेलेल्या लोकप्रतिनिधीला पाच वर्षातून एकदा तरी जनतेची आठवण ही यायलाच पाहिजे. एरवी वर्षातून, सहा महिन्यातून एकदा आपल्या मतदारसंघांमध्ये येऊन विकास कामे सुरू केल्याची माहिती सांगून जनतेला आपण विकास कामे करीत आहोत. याची आवर्जून आठवण करून देत. पुन्हा गल्लीतून दिल्लीत जाणारे हे लोकप्रतिनिधी यंदाच्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीचे तारीख जाहीर झाल्यापासून देशभर आजी-माजी आणि इच्छुक भावी खासदार,आजी माजी खासदार जनतेच्या भेटीसाठी आता गावोगाव फिरत असल्याचे दिसून येत आहेत .या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांनी एक गोष्ट मात्र विसरलेली नाही. ती गोष्ट म्हणजे मराठी माणूस हा उत्सव प्रेमी आहे. सणवार साजरे करणारा आहे. या उत्सवाचे निमित्त साधून सणाचे निमित्त साधून या मतदार बंधू-भगिनींना आपल्या शुभेच्छा या फोन द्वारे पोहोचवण्याचे देण्याचे काम आता हे आजी-माजी आणि भावी खास...