उमेदवार न पहाता कमळ पाहून लोक मतदान करतील का?

 

 पंढरपूर ( प्रतिनिधी) भाजपाने माढा मतदार संघातील लोकांना गृहीत धरून हे मतदार भाजपाने जो उमेदवार देतील त्याच्या कार्याकडे न पहाता फक्त कमळाचे चिन्ह पाहून मतदान करतील असे भाष्य सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील इच्छुक असलेले उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षाचे वरीष्ठ नेते व निरिक्षकांनी आपल्या पक्षाचे धोरण स्पष्टपणे सांगितले.

     माढा व सोलापूर येथील लोकसभेचे उमेदवारांच्या बद्दल लोकांच्या मध्ये नाराजी पसरली आहे.असे असताना भाजपा आम्ही जो उमेदवार देऊ त्याला लोक फक्त कमळाचे चिन्ह पाहून मतदान करतील असा त्यांचा अंदाज आहे.परंतू या दोन्ही मतदारसंघांत विकास कामे ही सर्वसामान्य जनतेपर्यंत अद्याप पोहचली नाहीत.भाजपाचे नेते तसेच कार्यकर्ते भाजपा ने केलेल्या कामाची माहिती ज  नतेपर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरले आहेत.

    सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही.या मतदार संघात गत लोकसभेचे उमेदवार विषयी प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले.परंतू त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अकलूज येथील मोहिते पाटील कुटुंबाने एक लाखाहून अधिक मताधिक्य भाजपाच्या उमेदवाराला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.मोहिते पाटील परिवारांमुळे या ठिकाणी भाजपा उमेदवार निवडून आले.

 मध्यंतरी च्या काळातील रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या मतभेदा वर उपाय करण्यात तसेच त्यांच्या मध्ये समेट घडवण्यात भाजपा नेतेमंडळी ना यश आले नाही. हेच यातून स्पष्ट होते. 

     माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे मोहिते पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग नाराज झाले आहेत.त्या कार्यकर्ते मधून आता "माढा आणि उमेदवार पाडा" अशी समाज माध्यमातून चर्चा सुरू आहे.

     लोकांच्या मनात आता संभ्रम निर्माण झाला आहे.आणि भाजपाचे नेते मंडळी कसे म्हणू शकतात.उमेदवारांच्या कडे न पहाता फक्त कमळाचे चिन्ह पाहून लोक मतदान करतात.

   लोकांच्या मनातील संभ्रमावस्था कशी दूर करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....