"उद्या ची लोकसभा निवडणूक ही लोकशाही तील शेवटची निवडणूक असेल " तरी मतदारांनी विचार करून मतदान करावे...... सुशील कुमार शिंदे
पंढरपूर ( प्रतिनिधी) गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या देशाला अधोगतीला नेण्याचे काम करणारे हे भाजप सरकार आहे. हे सरकार फक्त आश्वासन देत राहते. काँग्रेसच्या राजवटीमध्ये केलेल्या विकास कामाचे श्रेय हे भाजप सरकार आज घेत आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या सरकारने एनटीपीसी हा प्रकल्प आणला त्याचप्रमाणे तिन्ही राज्याला जोडणारे महामार्ग काँग्रेसच्या राजवटीमध्ये तयार करण्यात आले. परंतु या प्रकल्पाचे श्रेय हे आज भाजपा सरकार घेत आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेले विकास कामे यांची आज भाजपा उद्घाटन करून श्रेय घेत आहे.
सर्वधर्मसमभाव मानणारी आपली राज्य प्रणाली असून देखील आज देशांमध्ये जाती-जातीमध्ये, धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. हे आपल्या देशाच्या हिताचे नाही. आपला देश सर्वधर्मसमभाव मानणारीआहे. ही परंपरा कायम राखायची आहे. उद्याची निवडणूक ही लोकशाहीतील शेवटची निवडणूक असेल. तरी जनतेने विचार करून मतदान करावे. या येत्या निवडणुकीनंतर भाजपा विजयी झाले तर लोकशाही जाऊन हुकूमशाही येईल. असे मनोगत केंद्रीय माजी गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा