"सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे गेली दहा वर्षे रखडली" राम सातपुते.

 पंढरपूर ( प्रतिनिधी) सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे ही गेली दहा वर्षे रखडली गेली आहेत.याला जबाबदार प्रणिती शिंदे यांचे कुटुंब आहे.असे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांनी पंढरपूर येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

         श्रीविठ्ठल रुक्मिणी चे आशिर्वाद घेण्यासाठी प्रथमच पंढरपूर येथे आले असता पांडुरंगाच्या चरणी त्यांनी आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी खासदार म्हणून निवडून द्यावे.अशी प्रार्थना त्यांनी केली.

       मी या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार आहे.असा आत्मविश्वास व्यक्त केला.पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण देशभरात ओळखले जावे.  पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार आहोत.असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.देशाच्या विकासासाठी मोदींना पुन्हा एकदा जनतेनी निवडून द्यावे.असे आव्हान केले.

     राम सातपुते यांच्या सोबत पंढरपूर शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....