"मोहिते पाटील यांना कार्यकर्ते चे ऐकावे लागले " तुतारी हाती घ्यावी लागली"
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघ मधून भाजपाचे उमेदवार रंजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून अकलूजचे मोहिते पाटील हे नाराज झालेले होते. गेल्या तीन-चार वर्षांपासून रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचे म्हणावे तसे जमत नव्हते. मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून इच्छुक आहोत असे सांगून देखील त्यांना भाजपा कडून डावलण्यात आले. मोहिते पाटील यांच्या मताधिक्यामुळेच भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे गेल्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले होते.
भाजपने दिलेली माढा लोकसभा मतदारसंघातील हा उमेदवार बदला म्हणून सांगत होते. परंतु भाजपाने त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना खासदारकीची उमेदवारी देण्यात आली.
पंढरपूरचे माजी विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक पक्षाचे क्लस्टर हेड म्हणून कार्य करत होते. परंतु मोहिते पाटील यांचे समजूत काढण्यासाठी ते असमर्थ ठरले. हेच दिसून आले. मोहिते पाटील गटाचे बाळदादा मोहिते पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. की ,आम्ही आता तुतारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहोत. असंख्य कार्यकर्त्याच्या आग्रहा नुसार आम्ही शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारीचे चिन्ह हाती घेतले आहे. भाजपाचे सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव हा निश्चित ठरलेला आहे. असे त्यांनी यावेळी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
माढा लोकसभा मतदार संघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी भाजपचा पराभव होणार असून त्याचप्रमाणे सांगोला माळशिरस फलटण करमाळा इत्यादी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव हा निश्चित होणार आहे. असे देखील त्यांनी आज सांगितले.
कार्यकर्त्यांच्या आग्रहा नुसार आम्ही "तुतारी" ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे चिन्ह हाती घेऊन भाजपाचा पराभव करणार आहोत . असे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा