माढा आणि सोलापूर भाजपाच्या दोन्ही जागा धोक्यात?
पंढरपूर ( प्रतिनिधी ) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांसाठी सध्यातरी धोका होण्याचे संकेत मिळत असल्याचे दिसून येत आहे.माढा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे.परंतू या मतदारसंघातील भाजपाचे नेते मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या साठी उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते.परंतू पुन्हा एकदा भाजपाने खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली गेली.
मोहिते पाटील यांच्या गटाशी गेली.तीन,चार वर्षांत सुसंवाद राहिलेला नाही.त्यामुळे आणि या माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांचे वर्चस्व अद्यापही असल्यामुळे त्यांनी भाजपा कडे उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही होते.परंतू त्यांच्या गटाला ऩाकारण्यात आले.सद्या मोहिते पाटील यांना मानणारे लाखोच्या संख्येने मतदार असल्यामुळे त्याचप्रमाणे त्यांची या मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावांमधून कार्यकर्त्यांची फौज असल्यामुळे या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या कार्यकर्त्यांच्या मधून मोहिते पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी किंवा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी. अशी कार्यकर्त्यांमधून मागणी होत असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. भाजपा या पक्षाला माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मोहिते पाटील यांची नाराजी भोवणार की काय? अशी परिस्थिती सध्या दिसत आहे..
त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये देखील भाजपाने अद्यापही उमेदवार जाहीर केलेल्या नसल्यामुळे आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदारांच्या बद्दल असलेली नाराजी ही दिसून येत आहे. भाजपा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये आपण केलेल्या कार्याची माहिती देण्यास हे दोन्हीही लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघामधून स्थानिक उमेदवार भाजपाने द्यावा. याचा आग्रह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार धरत आहेत. या मतदारसंघांमध्ये भाजपाने कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी अद्यापही चालू आहे. आणि दुसरीकडे आय काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती ताई शिंदे यांची उमेदवारी जवळजवळ फिक्स झाल्यामुळे या मतदारसंघांमध्ये आमदार प्रणिती ताई शिंदे व त्यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. भाजपा अद्यापही या
दोन्ही मतदारसंघांमध्ये गोंधळलेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे. याचा फायदा विरोधकांना होतोय की काय ?असे चित्र सध्या या दोन्ही मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच या दोन्ही मतदारसंघातील जनता आज म्हणू लागलेली आहे. की या दोन्ही जागा भाजपासाठी धोक्याच्या ठरू पाहत आहे. अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा