"मतदानाच्या दिवशी आम्ही मतपेटीतून आमचे म्हणणे सांगू"....माढा मतदार संघातील युवकांचे मनोगत
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदार संघातील सार्वत्रिक निवडणूक ही जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आज माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर विभागातील कौठाळी, लक्ष्मी टाकळी,आढीव,रोपळे,गुरसाळे, बाभुळगाव, गोपाळपूर अशा गावांमधून जनमत घेण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या गावातील युवकांचे मनोगत ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. युवकांच्या मनामध्ये या निवडणूक विषयीची प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे व्यक्त झाल्या आहेत.
या युवकांच्या मनामध्ये सत्ताधारी असलेल्या सरकारवर प्रचंड नाराजीचा सूर हा ऐकायला मिळत होता. शेतकऱ्यांची मुलं हाताला काम नसल्यामुळे बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. उच्च शिक्षण असून देखील त्यांना नोकरी नसल्यामुळे आपल्या गावांमधील आपल्या शेतामध्ये ते सध्या राबत आहेत. शेती हा पारंपारिक व्यवसाय असला तरी या शेतीच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे बी, बियाणे, खते ही प्रचंड महाग झाल्यामुळे शेतकरी राजाला शेती करणे देखील अवघड झालेले आहे. त्याचप्रमाणे या मतदार संघामध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून देतो, म्हणून हे नेते प्रत्येक निवडणूकीला ते आश्वासन देतात. आणि एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा तोंड देखील दाखवायला या गावाकडे येत नाही. अशा उमेदवाराला आम्ही आमच्या मतपेटीच्या माध्यमातून आमची प्रतिक्रिया व्यक्त करू असे काही तरुणांनी सांगितले.
काही गावांमधून मराठा समाजातील लोकांनी आपले मनोगत व्यक्त करण्यास नकार देत त्यांनी आपली नाराजी ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील व्यक्त केल्याचे आढळून आली.तसेच ज्या नेत्यांनी मराठा समाजातील असून देखील मराठा आरक्षणाबाबत शासन दरबारी आवाज न उठवणाऱ्या अशा नेत्यांना देखील या निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तसेच या नेत्यांना मतदान करण्यावर बहिष्कार टाकणार की काय ? असा प्रश्न विचारला असता त्यांनी आम्ही मतदान करू परंतु आमची मत हे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ज्या कोणी पक्षांनी बाजू उचलली ज्या कुणी नेत्यांनी बाजू मांडली त्यांनाच आम्ही मतदान करू असे देखील काही लोकांनी सांगितले.
मतदार संघातील गावांमधून विकासकामे झाली का? या प्रश्नावर या काही गावांमधील लोकांनी गावांमधील रस्त्याकडे बोट दाखवून रस्त्याच्या दुरावस्थेला दाखवत यालाच विकास म्हणतात का? असा प्रति सवाल देखील काही लोकांनी व ग्रामस्थांनी केला.
उद्याच्या येऊ पाहणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघा मध्ये विविध पक्षाचे उमेदवार प्रचाराला आले असता त्यांना गावकऱ्यांच्या या प्रश्नाला उत्तर द्यावेच लागणार आहे. हे मात्र खरे आहे. गावकऱ्यांच्या असंख्य प्रश्नाला हे नेतेमंडळी काय उत्तर देणार? हे पहावे लागेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा