शरद पवारांनी "सहजपणे" सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा धोक्यात आणल्या.


 पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ या सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारकीच्या जागेच्या उमेदवारीसाठी भाजपामध्ये उमेदवार कोणता द्यायचा यावरून वादंग उठलेले होते. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आली. तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार हा स्थानिक द्यायचा की उपरा द्यायचा यावरून वादंग उठलेले होते. स्थानिक उमेदवार भाजपाने न देता उपरा असाच उमेदवार राम सातपुते यांच्या रूपाने देण्यात आला आहे.

          सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक भाजपाचे उमेदवार कित्येक असताना देखील त्यांना डावलण्यात आले. याचे शल्य सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदार हे स्थानिक लोकप्रतिनिधी द्या म्हणून त्यांच्या मागणी होती. परंतु उमेदवारी कोणाला द्यायची या वादामध्येच कितीतरी दिवस गेले. आणि त्या कालावधीमध्ये आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आपण आय काँग्रेसचे उमेदवार आहोत म्हणून मतदारसंघाचा फेरफटका देखील केला. या त्यांच्या गाव भेटीच्या मधून त्यांना सर्वत्र प्रतिसाद मिळत असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च भाजपाने खासदारकीची उमेदवारी दिलेली आहे.
       माढा तालुक्याचे लोकप्रतिनिधी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या बाबतीत कार्यकर्त्यांमध्ये आणि अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या गटांमध्ये नाराजीचे सूर हे गेली दोन-तीन वर्षे झाले बिघडलेले होते. ध्यैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाकडे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवारी मागितलेली होती. परंतु त्यांना ती नाकारण्यात आली. या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने जर का उमेदवार बदलला असता तर त्याचे संकेत महाराष्ट्रभर गेले असते. म्हणून भाजपाने अन्य जिल्ह्यातील बंडखोरी टाळण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी कायम राखून मोहिते पाटील यांची नाराजी ओढवून घेतली. असेच सध्यातरी दिसून येत आहे.
     सोलापूर जिल्हा आणि शरद पवार यांचे नाते कित्येक वर्षापासून हे अतूट आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये येणारे तालुके करमाळा, माढा, सांगोला, पंढरपूरचा काही भाग माळशिरस तालुका या तालुक्यांमध्ये शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता आणि जनता देखील आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची तुतारी घेऊन मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी. असे कार्यकर्त्यांची मागणी सर्वत्र दिसून येत असल्यामुळे मोहिते पाटील यांनी देखील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी याचा स्वीकार केल्याचा आज दिसून येत आहे. या सर्वांमध्ये शरद पवार यांची खेळी आणि महत्व दिसून येत आहे. त्यामुळेच या सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जागरूक जनता म्हणत आहे. की शरद पवारांनी सहजपणे सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही भाजपाच्या जागा धोक्यात आणल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....