" सातपुुते उमेदवार " उपरा" आता फिरावं लागलं कानाकोपरा" शिवसेना ( शिंदे गट) कार्यकर्तेंचे ऐकावे लागणार
पंढरपूर ( प्रतिनिधी) उमेदवारी याला द्यायची का त्याला द्यायची या वादा नंतर अखेर भाजपाचा उमेदवार ठरला. राम सातपुते हे भाजपाचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.
राम सातपुते सध्या ते माळशिरस विधानसभा चे आमदार असून त्यांची सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी जाहीर केलेली आहे. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमधील जनतेचे म्हणणं असे आहे. की आता आम्हाला उपरा उमेदवार नको आहे. आणि उमेदवार हा स्थानिक हवा म्हणून असा सध्या हट्ट धरला जात आहे. काँग्रेसच्या प्रणिती ताई शिंदे या स्थानिक उमेदवार आहेत. त्यांच्याच विरोधात आता भाजपाने राम सातपुते यांना उमेदवारी देऊन सोलापूर जनतेला उपरा उमेदवार देण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपा उमेदवाराला आता महा युतीतील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट,या पक्षा तील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आता लोकसभेच्या प्रचार करावा लागणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील व पंढरपूर शहरातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले हे शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख असून त्यांनी आपल्या मनोगतामध्ये राम सातपुते जरी हे उपरा उमेदवार आम्हाला दिलेला असला तरी राम सातपुते यांनी पंढरपूर शहरातील व परिसरातील विविध विकास कामे त्याचप्रमाणे मराठा भवन आणि पंढरपूर येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा ज्वलंत प्रश्न हा मार्गी लावला जायला हवा याची हमी राम सातपुते यांनी द्यायला हवी. तरच आम्ही शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राम सातपुते जरी उपरे असले तरी निवडून आणण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करणार. परंतु राम सातपुते यांनी आमच्या काही मागण्या या मान्य केल्या तरच आम्ही सहकार्य करू आमच्या मागण्या मान्य होतील असे अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे प्रदर्शना मार्गावर स्त्रियांसाठी सुलभ शौचालय नाही ते बांधले जावे. अशी देखील मागणी शिवसेना शिंदे गट पंढरपूर शहर अध्यक्ष विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी केली.
राम सातपुते यांना आता शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शहरातील कानाकोपरा हा धुंडाळावा लागणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा