" मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट कॅरिडोर ला विरोध करणारे कोण?..... . कॅरिडॉर मंजूरी प्रस्तावाला स्थगिती......
पंढरपूर.......... . गेली काही वर्ष पंढरपूर शहरासाठी चर्चित असलेला विषय म्हणजे पंढरपूर कॅरीडोर. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना या ठिकाणी वावरताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असतो.या ठिकाणी अरुंद असा रस्ता व बोळ यामुळे गर्दीची दाटीवाटी होते. यावर उपचार म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील पंढरपूर शहरासाठीचे चित्र या कॅरीडोर च्या माध्यमातून साकार होणार आहे. महाराष्ट्र शासनाने 4000 कोटी रुपये चा निधी कॅरिडॉर मधील विकास कामासाठी व बाधित रहिवासी व दुकानदारांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. असे शासनाने जाहीर केले या कॅरिडॉर साठी विविध निवेदा जाहीर झाल्या नकाशे तयार होऊ लागले बाधितांचे पुनर्वसन कुठे करायचे याचे देखील नियोजन शासनाने केले परंतु 1982 साली जो मास्टर प्लॅन झाला त्यामध्ये कित्येकांची घरे व दुकाने बाधित झाले या बाधितांना नाममात्र मोबदला मिळाला पुनर्वसन देखील अर्धवट झाले असे असल्यामुळे पुन्हा आपल्या दुकान व घर जाग्यावर विकास कामाच्या नावाखाली नांगर फिरणार असे या बाधितांना वाटत अ...