" साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतल्यास कारखाने बंद पाडणार"..... . दीपक भोसले ऊस दर संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष .
पंढरपूर. ...
. ऊस दर संघर्ष समिती यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी दिल्ली येथे जंतर-मंतरवर दिनांक 5 ऑक्टोबर व 6 ऑक्टोबर 2026 रोजी आंदोलन करणार आहे. या दिल्ली येथील जंतर मंतर वरील आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातून दीड ते 2000 ऊस उत्पादक शेतकरी जाणार आहे. अशी माहिती ऊस दर संघर्ष समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक भोसले यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितली.
. या ऊस दर संघर्ष समितीच्या मागण्या पुढील प्रमाणे असून 1) साखरेची आधारभूत किंमत 50 रुपये करावी 2) उसापासून च्या इथेनॉलचा दर 75 रुपये प्रति लिटर करावा 3) साखर जीवना आवश्यक यादी मधून वगळण्यात यावी.4) घरगुती वापरासाठी लागणारी व उद्योगधंद्यासाठी लागणारी साखरकोोटा वेगवेगळ्या निश्चित करून त्याचे दरही अनुक्रमे 50 रुपये व शंभर रुपये करावेत.5) दोन कारखान्यामधील हवाई अंतराची अट रद्द करावी. अशा प्रमुख मागण्या घेऊन महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी दिल्ली येथे जंतर-मंतरवर दिनांक पाच व सहा ऑक्टोबर 2026 रोजी आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून पाठिंबा मिळत असून दिल्ली येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला व ऊस दरा बाबत झोपेची सोंग घेणारे भाजपा सरकारला जागे करण्याचे काम ऊस दर संघर्ष समिती करणार आहे अशी माहिती शेतकरी नेते दीपक भोसले यांनी दिली.
. संपूर्ण देशामध्ये सर्व वस्तूंचे व मालाचे भाव वाढ झालेली आहे परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव दर वाढवलेला नाही उसाला लागणारे खत व अन्य फवारणी खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे परंतु ऊस दर हा अतिशय कमी प्रमाणात दिला जातो. उसाचे उत्पादन खर्च वाढलेल्या आहे परंतु ऊसाला दर मिळालेला नाही त्याचप्रमाणे सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीनेच खाजगी साखर कारखाने हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आजपर्यंत या सर्व नेतेमंडळींनी सहकार क्षेत्र हे मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि खाजगी साखर कारखाने उभे केली जात आहेत. हे सर्व कारखानदार एकत्र येऊन शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रयत्न करीत होते परंतु शेतकरी संघटनेने आवाज उठवून कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेण्याचे काम देखील या शेतकरी संघटनेने केलेल्या आहेत.
. ऊस क्षेत्र घटलेले आहे त्यामुळे शेतकरी कामगार यांची वाईट अवस्था झालेली आहे या ऊस उत्पादक आणि कामगारांचे काळजी घेण्यात यावी यासाठी दिल्ली येथील जंतर मंतर या मैदानावर 5 ऑक्टोबर व 6 ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार आहोत या आंदोलनाला महाराष्ट्र राज्यातील माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी नेते व अन्य शेतकरी नेते मंडळी व कार्यकर्ते ऊस उत्पादक शेतकरी हे या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत. या आंदोलनानंतर सहा ऑक्टोबर रोजी वाणिज्य विभाग मंत्रालय तसेच सहकार मंत्रालय या मंत्रालयाला शेतकऱ्यांच्या मागण्या बाबत भेट घेणार आहेत.
. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जंतर-मंतरवर गेल्या सात आठ वर्षापासून एम एस पी वाढवलेली नाही एम एस पी न वाढवल्यामुळे सर्व कारखाने अडचणीत आहेत शेतकरी संघटना या विविध प्रकारच्या आहेत या सर्व संघटना शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्व संघटना एकत्र येऊन ऊस दर संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडून मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहणार आहे.
. साखर कारखाने लवकर सुरू झाल्यास शेतकरी व कारखानदाराचे नुकसान होणार आहे रिकवरी कमी लागण्याची शक्यता आहे म्हणून कारखानदाराने साखर कारखाने लवकर सुरू करू नये. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या विरोधात कारखाने सुरू केल्यास हे सर्व ऊस कारखाने बंद पाडणार अशी ठाम भूमिका ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक भोसले यांनी व्यक्त केली.
. या पत्रकार परिषदेस सचिन पाटील प्राध्यापक सुहास पाटील माऊली जवळेकर अजित बोरकाटे निवास नागणे सालगुडे पाटील समाधान पाटील व असंख्य शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा