" भालके यांनी सत्ताधारी गटामध्ये का सामील होऊ नये?.
पंढरपूर प्रतिनिधी.
विधानसभेच्या एक पोट निवडणूक आणि एक विधानसभा निवडणूक या दोन निवडणुकीमध्ये विजयाच्या जवळपास मताध्यक्ष मिळवणारा करून व्यक्तिमत्व म्हणून भगीरथ भालके यांच्याकडे पाहिले जाते.आपले वडील कै. भारत नाना भालके यांच्या पेक्षा देखील सातत्याने अधिक मत घेणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे भगीरथ भालके थोड्याफार फरकाने पराभव पत्करलेले भगीरथ भालके यांच्यासाठी भविष्य काळामध्ये पंढरपूर तालुक्याचे आमदारकी भूषवण्याची योग येणार हे यावरूनच दिसून येते.
भगीरथ भालके यांच्यावर पक्ष बदलू म्हणून आरोप केला जातो परंतु सर्वसामान्य जनतेचे गोरगरीब शेतकरी कष्टकरी ऊस उत्पादक यांचे जर का प्रश्न सोडवायचे असतील तर विरोधी गटांमध्ये राहून जनकल्याणाची कामे विकास कामे ही होऊ शकत नाही हे कोणीही सांगू शकेल. नुकत्याच झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी डॉ. प्रणीती ताई भालके यांनी प्रचंड मताधिक्य मिळवून नगरपालिकेमध्ये असलेले प्रस्थापितांचे मनसुबे आणि मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम प्रणिती भालके यांनी केलेले आहे त्यामुळे सत्ताधारी गटामध्ये सामील असलेले पंढरपूर नगरपालिकेतील प्रस्थापित नेतेमंडळी कडून विरोधाला विरोध म्हणून भालके यांना विरोध सुरू झाला. प्रणिती भालके यांनी पंढरपूर शहरातील अस्वच्छता तसेच अतिक्रमण नदी स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्या स्वतः उतरल्यामुळे विरोधकांना देखील हातामध्ये झाडू घ्यावा लागला. याची डोळा याची देही पंढरपूर वासियांना पहावयास मिळाले.
भालके हे सद्यस्थितीला सत्ताधारी गटांमध्ये नसल्यामुळे त्यांची विविध पद्धतीने कोंडी करण्याच्या उद्देशाने प्रस्थापित विरोधक विरोध करू लागले त्यामुळेच भगीरथ भालके यांनी सर्वसामान्य जनतेची कामे तसेच शहरातील विकास कामे स्वच्छता आणि भाविक भक्त वारकरी संप्रदायाचे साठी आवश्यक असलेल्या उपाययोजना या जर का राबवायच्या असतील तर सत्ताधारी गटामध्ये सामील व्हावेच लागेल कारण सर्वसामान्य जनतेची कामे जर करायचे असतील तर शासनाकडून निधी त्याचप्रमाणे विकास कामासाठी जी मंजुरी अशा अनेक विविध विकास कामे जर का राबवायचे असतील तर सत्ताधारी गटांमध्ये सामील झाले तरच आपण सर्वसामान्य जनतेची विकास कामे करू शकतो हे जाणवल्यामुळेच भगीरथ भालके यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षामध्ये सामील होण्याचे ठरवले असेच भालके गटाकडून बोलले जाते.
रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके व त्यांचा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटामध्ये उद्या प्रवेश करीत आहे. एकनाथ शिंदे हे सत्ताधारी मध्ये असल्यामुळे पंढरपूर शहरातील विकास कामे हे त्वरित व जलद गतीने होतील व विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिले जाऊ शकते अशी खात्री बाळगूनच भगीरथ भालके यांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे समजते.
पाहूया पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भाजपा पक्षाचे आजी-माजी आमदार यापुढे कुठली भूमिका घेतात ते पाहणे आवश्यक ठरेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा