" लाडक्या बहिणी आणि रोंगे सरांच्या लाडक्या विद्यार्थीनी साठी नऊ मजली वस्तीगृह उभारून मुलींची राहण्याची सुविधा"...... पालकमंत्री जयकुमार गोरे
पंढरपूर.( प्रतिनिधी) ग्रामीण भागातील बहुजन समाजामधील भावी पिढीला शैक्षणिकदृष्ट्या प्रगत करण्याच्या उद्देशाने रोंगे सर यांनी गोपाळपूर सारख्या माळरानावर तंत्र शिक्षणाची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बहुजन समाजामधील असंख्य मुलांमध्ये या ठिकाणी उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहे. मुलींचे पालक हे आपल्या मुलीला उच्च शिक्षणाची संधी व सुविधा उपलब्ध या ठिकाणी झाल्यामुळे कित्येक पालक हे आपल्या मुलीला उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने या स्वेरी या शिक्षण संकुलामध्ये दाखल करीत आहेत. या ठिकाणी डॉ. बीपी रोंगे सर यांनी मुलींच्या साठी नऊ मजली इमारत उभारून मुलींच्या राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे .त्यामुळे पालक कुठलीही चिंता न करता या ठिकाणी आपल्या मुलीला वस्तीगृह मध्ये ठेवत आहेत. मुलींची राहण्याची सोय झाल्यामुळे या ठिकाणी पाचशे ते सहाशे विद्यार्थिनींची राहण्याची, जेवणाची तसेच चहापाण्याची आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेली हे वसतिगृह डॉ. बीपी रोंगे सर यांनी चालू केल्यामुळे अनेक पालकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे. असे मनोगत अध्यक्ष स्थानावरून सोलापूर जिल्ह्याच...