विश्वजित (मुन्ना) भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य पदी निवड..
पंढरपूर प्रतिनिधी.. पंढरपूर शहरातील शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी त्यांची आज निवड करण्यात आली. विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांच्या समाज कार्याला अजूनही वाव मिळावा त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील गोरगरीब रुग्ण यांची सेवा घडावी या उद्देशाने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी त्यांची ही निवड करण्यात आली. विश्वजीत उर्फ मुन्ना भोसले यांनी आजपर्यंत त्यांनी पंढरपूर शहरांमध्ये असंख्य वेळा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच गोरगरिबांचे शासकीय कार्यालयामधील अडीअडचणी व कामे त्यांनी केलेली आहे त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.