"पंढरी सायक्लोथान2025.सायकल प्रेमी साठी आयोजित"........सागर कदम.


 पंढरपूर प्रतिनिधी.....

    चंद्रभागा नदी संवर्धनासाठी राबवीत असलेला उपक्रम या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन च्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा देखील फेब्रुवारीच्या महिन्यांमधील 16 फेब्रुवारी 2025 रविवार या दिवशी ठीक सकाळी सहा वाजता पंढरपुरातील लहान,थोर सर्व वयोगटातील सायकल प्रेमींना या पंढरी सायकल 2025 या उपक्रमामध्ये सामील होण्याचे आवाहन आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी केलेले आहे.  

    पंढरपूर शहरातील सायकल प्रेमी च्या साठी पंढरी सायकल 2025 या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश  हा मोफत ठेवलेला आहे.प्रत्येक सायकल प्रेमींनी आपले नाव नोंदणी करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सादर कदम यांनी आज रोजी केले.

      या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना अडीच किलोमीटर तसेच सात किलोमीटर अशा अंतराची सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक सदस्याला टी-शर्ट त्याचप्रमाणे गुल्कोजचेपाणी, खाऊ वाटप आणि प्रशस्तीपत्र देण्याचे नियोजन केले आहे. अशी माहिती सागर कदम यांनी आज रोजी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....