"मनगटात जर ताकद आणावयाची असेल तर संविधानाचा अभ्यास केला पाहिजे"...मा.मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे सर



 पंढरपूर.प्रतिनिधी... प्रस्थापितांच्या विरोधात आणि अन्यायाच्या विरोधात जर उभे राहायचे असेल तर आपल्या मनगटामध्ये ताकद असायला हवी जर का मनगटामध्ये ताकद आणावयाची असेल तर प्रत्येकाने संवेदनाचा अभ्यास करायला हवा असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी आज पंढरपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित असलेले माजी नगरसेवक डी राज सर्व गोड यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यामधील विविध क्षेत्रांमध्ये आपली उच्च कामगिरी करीत असलेल्या मान्यवरांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला या ओळी बोर्ड असताना माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्येची कास धरल्यामुळे त्यांनी आपल्या जीवनामध्ये असंख्य पदव्या संपादित केल्या संपूर्ण जगभरातील राज्यघटनेचा अभ्यास करून त्यांनी आपल्या भारत देशाची संविधान मसुदा निर्माण केला. स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि मानवता या गोष्टींना प्राधान्याने महत्त्व दिले गेले त्यामुळे संपूर्ण भारत देशामधील लोकशाही आज टिकून आहे विविध भाषा धर्म जातपंत या सर्वांना एका मानवतेच्या वृक्षाच्या छायेखाली तमाम भारतीयांना आणण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने केलेले आहे.

    काही प्रस्थापित लोक आपल्या सत्तेच्या जोरावर तसेच पैशाच्या जोरावर दिन दलित दुबळ्या दलितांच्या वर अत्याचार करीत असतात अशा जुलमी लोकांना धडा शिकवण्यासाठी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून तसेच संघटनेच्या माध्यमातून लढा देण्यासाठी दलित बांधवांनी सतत जागरूक राहिले पाहिजे ॲट्रॉसिटी चा वापर शेवटच्या टोकाला जर एखादा घटना गेले असेल तरच त्याचा वापर करावा ॲट्रॉसिटी चा वापर उठ सूट केव्हाही केला जाऊ नये ॲट्रॉसिटी चा वापर झाला तर त्या आरोपीला कडक शासन हे झालीच पाहिजे तरच अट्रासिटी चा वापर केला जावा असे त्यांनी आपल्या मनोगत मधून व्यक्त केले.या या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल सावंत, माजी उपनगराध्यक्ष  नागेश काका भोसले, श्याम गोगाव संचालक पंढरपूर मर्चंट बँक, स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉ. बीपी रोंगे सर, माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील, आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....