"मोहिते पाटील भाजपात असले की लोकशाही...भाजपा सोडली की मोहिते पाटील यांची ठोकशाही? असं कसं"? सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न?
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदार संघात लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे पूर्वी भाजपा या पक्षात असलेले मोहिते पाटील परिवार आज घडीला भाजपा पक्ष सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या वतीने तुतारी हे चिन्ह घेऊन ते भाजपाच्या उमेदवाराविरोधात आज उभे ठाकले आहेत. मोहिते पाटील परिवार हे गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हे भाजपा मध्ये होते. परंतु विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी गेल्या तीन चार वर्षांपासून कुठल्याच बाबतीत विचार विनिमय हे पटत नसल्यामुळे मोहिते पाटील रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यापासून दूर गेलेले होते. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नका म्हणून मोहिते पाटील भाजप नेत्यांना सांगत होते परंतु रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाच्या पहिल्या यादीतच माढा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळाल्यामुळे मोहिते पाटील परिवार नाराज झालेला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघांमधून भाजपा कडे उमेदवारीची मागणी क...