"राजकन्येच्या विरोधात गरीब शेतकऱ्यांचा मुलगा निवडणूक लढतो आहे.".... राम सातपुते.
पंढरपूर ( प्रतिनिधी). प्रस्थापित आणि विस्थापित या दोन्हीच्या लढाईमध्ये मी विस्थापिताच्या बाजूने आणि एका राजकन्याच्या विरोधात एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा निवडणूक लढवीत आहे. असे वक्तव्य सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी आज पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसे या पक्षाने आयोजित केलेल्या प्रचार सभेमध्ये बोलत असताना राम सातपुते यांनी केले.
मोदी सरकारने गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूर या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना जोडणारे महामार्ग हे हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते बनवले आहेत. त्याचप्रमाणे पंढरपूर फलटण या रेल्वे मार्गाला मंजुरी तसेच निधी हा मंजूर केलेला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोफत राशन आणि गोरगरिबांना घरकुल योजनेच्या माध्यमातून हजारो गरिबांना घरी बांधून दिले आहेत. उज्वला या योजनेच्या अंतर्गत महिलांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सहा हजार रुपये असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेन्शन म्हणून जमा केली जात आहे. याचे सर्व श्रेय हे भाजपा सरकारला जाते.
आपल्या भारत देशाला जागतिक स्तरावर नेण्याचे काम मोदी सरकारने केलेले आहे. म्हणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचे ठरवलेले आहेत. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपा पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण मतदारांनी निवडून द्यावे. असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आज रोजी केले.
प्रचार सभेत उपस्थित आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, पंढरपूर शहर मनसे अध्यक्ष संतोष कवडे तसेच पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील आणि सोलापूर जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील मनसेचे अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा