"मोदींच्या गॅरंटी चे काही खरे नाही".... सुशीलकुमार शिंदे


 पंढरपूर ( प्रतिनिधी)" मोदी यांच्या गॅरंटीचे काही खरे नाही." असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील  कुमार शिंदे यांनी आज पंढरपूर येथे डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना या संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने आयोजित आज वार्ता लाप घेण्यात आला. त्यावेळी उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे यांनी या वार्तालाप मध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

   सुशील कुमार शिंदे वार्तालाप मध्ये पुढे बोलत असताना ते म्हणाले गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपा सरकारने फक्त आश्वासन देण्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलेले नाही. बेरोजगार तरुणांना दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळवून देतो म्हणाले, परंतु ते दिले नाहीत. रोजगाराची गॅरंटी त्यांनी दिले नाही. महागाई, गॅस, पेट्रोलचे दर कमी करतो म्हणाले याची त्यांनी गॅरंटी दिली होती. पण ती देखील फसवी निघाली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देतो म्हणाले परंतु आज शेतकरी कर्जबाजारी झालेला दिसून येत आहे. अशा या मोदी सरकारचे व मोदीची गॅरंटी ही फक्त फसवी आहे . मोदींच्या गॅरंटीचे  काही खरे नाही. असे सुशीलकुमार शिंदे यांनी आज वार्तालाप मध्ये आपले मत व्यक्त केले. 

   मोदी सरकारने राजकीय फायद्यासाठी विरोधकांच्या मागे चौकशीचे सत्र सुरू ठेवून ईडी,सीबीआय या सरकारी यंत्रणेला या विरोधकाच्या मागे लावून त्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न केले. व आपल्या पक्षांमध्ये सामील करून घेतले. कुठलेच घोटाळे किंवा आरोप सरकार उघडकीस आणू शकले नाहीत. राजकीय फायद्यासाठी त्यांनी ईडी, सीबीआयच्या सारख्या शासकीय यंत्रणा सूडबुद्धेने विरोधकाच्या विरोधात वापरून विरोधकांना जेरीस आणण्याचे काम केले आहे. ही लोकशाहीला अभिप्रेत नाही. लोकशाहीला मारक ठरेल असे वर्तन या भाजपा सरकारचे आहे. हे भारतातील लोकशाहीला

 घातक आहे. असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले.

    भाजपाने राम मंदिर उभा केले. असे ते सारखे म्हणत आहेत. परंतु श्रीराम हे सर्वसामान्यांच्या मनामध्ये, नसा नसा मध्ये आहे. रामाचा वापर भाजपाने राजकारणासाठी केला. आम्ही तसा वापर कधी केलेला नाही. 

     सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही जागेसाठी सोलापूर जिल्ह्यातील विजयसिंह मोहिते पाटील आणि मी व शरद पवार हे तिघे एकत्र आल्यामुळे भाजपाची झोप उडाली आहे . त्यांनी आता फोडाफोडीचे राजकारण सुरू केलेले आहे. आता कार्यकर्त्यांची व नेतेमंडळीची पळवा पळवी भाजपा करीत आहे. हे भाजपाला आता समजून चुकले आहे की आपला पराभव अटळ आहे. म्हणूनच असे हे पळवा पळवी चे राजकारण भाजपा सरकार करत आहे .असे सुशील कुमार शिंदे यांनी वार्तालापमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.्

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....