"प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित असा लढा आहे " ... डॉ.तानाजी सावंत. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी प्रचार सभा आयोजित केली.
पंढरपूर ( प्रतिनिधी) काँग्रेस सरकारच्या साठ वर्षांमध्ये काँग्रेसने फक्त प्रस्थापित लोकांचं भलं केलेले आहे. देशातील 80% विस्थापितांना त्यांनी आजपर्यंत न्याय दिलेला नाही. विस्थापितांचे भलं करण्यासाठी ,कल्याण करण्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी भाजपाचे सरकार सत्तेवर यावे लागले. भाजपा सरकारच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार, जातीय दंगली, बॉम्बस्फोट, आर्थिक घोटाळे अशा देशाला हानीकारक आणि जनतेला लुटू पाहणाऱ्या प्रस्थापित मंडळीवर कायद्याचा बडगा उभारला. तर हे काँग्रेस सरकार म्हणते आम्ही हुकूमशाही सुरू केली आहे .चुकीची कारवाई हे सरकार करत आहे असे खोटेनाटे आरोप काँग्रेस सध्या निवडणुकीच्या प्रचारद्वारांमध्ये करत आहे. असे डॉ. तानाजी सावंत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसे या पक्षाच्या नियोजनाखाली आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या दौऱ्यानिमित्त येथे आले. असता प्रचार सभेमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
भाजप सरकारच्या राजवटीमध्ये देशभरामध्ये असंख्य सुधारणा या घडून आलेले आहेत. देशभरातील रस्ते त्याचप्रमाणे गोरगरीब कष्टकरी जनतेला आपल्या हक्काचे घर त्यांनी दिलेले आहे. ग्रामीण भागामध्ये वीज पुरवली आहे. जल संजीवनी च्या माध्यमातून देशभरातील प्रत्येक गावोगावी पिण्याचे पाण्याचे नियोजन केले आहे.गेली काही वर्ष 80 टक्के जनतेला मोफत धान्य हे उपलब्ध करून दिले आहे. आरोग्याची हमी घेऊन त्यांनी पाच लाख रुपये पर्यंतच्या आरोग्याची तसेच औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अशा अनेक कामे ही भाजपाच्या सरकारच्या राजवटीमध्ये झालेले आहेत. आणि या योजना सध्या सुरू आहे. आज पर्यंत काँग्रेसने लुटारु चे काम केलेले आहे. प्रस्थापित विरोधात विस्थापित अशी ही संघर्षाची लढाई सध्या सुरू आहे. सर्वसामान्य मतदार बंधूंनी आता प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित या संघर्ष लढाया मध्ये येत्या सात तारखेला भाजपाचे उमेदवार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघातील रणजीत सिंह नाईक निंबाळकर या भाजपाच्या दोन्ही उमेदवाराला निवडून द्या. असे आवाहन डॉ. तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या वतीने प्रचार सभा आयोजित केली होती. त्यावेळी हे आव्हान केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा