"मोहिते पाटील भाजपात असले की लोकशाही...भाजपा सोडली की मोहिते पाटील यांची ठोकशाही? असं कसं"? सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न?
पंढरपूर ( प्रतिनिधी) माढा लोकसभा मतदार संघात लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे पूर्वी भाजपा या पक्षात असलेले मोहिते पाटील परिवार आज घडीला भाजपा पक्ष सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या वतीने तुतारी हे चिन्ह घेऊन ते भाजपाच्या उमेदवाराविरोधात आज उभे ठाकले आहेत.
मोहिते पाटील परिवार हे गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हे भाजपा मध्ये होते. परंतु विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी गेल्या तीन चार वर्षांपासून कुठल्याच बाबतीत विचार विनिमय हे पटत नसल्यामुळे मोहिते पाटील रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यापासून दूर गेलेले होते. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊ नका म्हणून मोहिते पाटील भाजप नेत्यांना सांगत होते परंतु रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाच्या पहिल्या यादीतच माढा लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळाल्यामुळे मोहिते पाटील परिवार नाराज झालेला होता. धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हाडा लोकसभा मतदारसंघांमधून भाजपा कडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु त्यांना ती मिळाली नाही. तसेच या लोकसभा मतदारसंघातील विकास कामे आणि विविध योजनांच्या बाबतीत मोहिते पाटील व निंबाळकर यांच्यात असलेले वाद हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी न मिटवल्यामुळेन आज मोहिते पाटील परिवार हे भाजपा सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे.
आज माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा झाल्या. या सभेमधून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील परिवारावर प्रचंड टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार हा अचिंबित झालेला असून तो आता चर्चा करू लागलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीस व नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतर आम्ही जनसंवाद साधला असता या भागातील लोक व्यक्त होताना दिसून येत आहेत. ते म्हणू लागले आहेत, गेली पाच सहा वर्ष मोहिते पाटील परिवार हे भाजपात होते. त्यावेळी ते लोकशाहीचे पालन करीत होते. आणि आता भाजपाला सोडून गेले असल्यामुळे आता त्यांची ठोकशाही कशी?
मोहिते पाटील यांची ठोकशाही व दशहत ही संपवून टाकू असे. असे जे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे भाजपाचे नेते हे कसे दुटप्पी पणे बोलतात व वागतात याचा अनुभव माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला येऊ लागलेला आहे. ते आता जनसंवादाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले आहेत.
मोहिते पाटील परिवारावर टीका करीत असताना देवेंद्र फडणवीस यांनी कित्येक गंभीर आरोप त्यांनी केले. त्याचप्रमाणे मोहिते परिवारांची या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये दहशत आहे. त्यांची ठोकशाही आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली या टीकेवर सर्वसामान्य जनता व्यक्त होऊ लागलेली आहे. मोहिते पाटील भाजपात असले की ते लोकशाही पाळतात भाजप सोडून गेले की ठोकशाही हा काय प्रकार आहे? असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागलेली आहे.
भाजपा नेते मंडळींनी माढा लोकसभा मतदार संघामधून आरोप प्रत्यारोप टीका ही करत असल्यामुळे सर्वसामान्य मतदार या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने पाहू लागलेला आहे. मोहिते पाटील परिवारावर झालेली टीका ही माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांना रुचली नाही. असेच दिसून येते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा