"विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त... आमदार अभिजीत आबा पाटील विठ्ठलाच्या पादुका घेऊन देगाव कडे प्रस्थान करणार ".....
पंढरपूर ( प्रतिनिधी) श्री विठुरायाच्या पादुका घेऊन माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील हे आपल्या देगाव गावाकडे दिंडी मधून उद्या सकाळी आठ वाजता ते विठुरायाच्या पादुका घेऊन जाणार आहेत.
या विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव 2025 च्या निमित्ताने भव्य कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. या कीर्तन सोहळ्यामध्ये बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन दुपारी एक वाजता होणार असून त्याचप्रमाणे ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन सायंकाळी सात वाजता होणार असून याचा लाभ सर्व भाविक भक्त व वारकरी संप्रदायाने घ्यावा असे निमंत्रण आमदार अभिजीत आबा पाटील मित्र मंडळ यांनी दिले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा