"फक्त वारी पुरती अतिक्रमण हटाव मोहीम की कायमस्वरूपी मोहीम "...


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . सध्या पंढरपूर शहरामध्ये वारीच्या निमित्ताने अतिक्रमण हटाव मोहीम नगरपालिका पंढरपूरच्या वतीने राबवली जात आहे. काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेत असून पंढरपूर नगरपालिकेने पंढरपूर शहरामध्ये असलेले अतिक्रमण हे त्वरित हटवावे असे आदेश दिले होते. त्यानुसार पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच उपविभागीय पोलीस पोलीस अधीक्षक भोसले व पोलीस कर्मचारी व नगरपालिकेतील अतिक्रमण हटाव कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पंढरपूर शहरातील नगरपालिकेसमोरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू झाल्याचे दिसून आले. 

   पंढरपूर शहरांमध्ये होणाऱ्या चार यात्रेच्या निमित्ताने असे अतिक्रमण हटवण्याचे उपक्रम नगरपालिका फक्त वारीपुरतेच अमलात आणत असतात .त्यानंतर पुन्हा जैसे थे अतिक्रमण पंढरपूर शहरांमधून होत असते. असे हे होणारे अतिक्रमण कायमस्वरूपी कसे हटविले जाईल यावर उपचार यंत्रणा ही नगरपालिकेने व पोलीस प्रशासनाने राबवली पाहिजे. दुकानदाराने केलेल्या अतिक्रमणामुळे पंढरपूर शहरांमधील सर्व रस्त्यांमधून गाड्यांची गर्दी ,ग्राहकांची गर्दी ही दिसून येते या अतिक्रमणामुळेच कित्येक ठिकाणी अपघात झालेले असून त्याचप्रमाणे या अतिक्रमणामुळे शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी होत असून याला जबाबदार हे अतिक्रमण करणारे दुकानदारच असून त्याचप्रमाणे वारी कालावधीमध्ये रस्त्याच्या मध्यभागी बसून तसेच रस्त्याच्या कडेला बसून आपला व्यापार करणारे लोकांची संख्या देखील तेवढीच मोठी आहे. अशा छोट्या व्यापाऱ्यांना पंढरपूर शहरातील वेगळ्या ठिकाणी त्यांच्या व्यापाराची सोय करण्यात यावी. अशी मागणी देखील पंढरपूर नगरवासी करत असून त्याला पंढरपूर नगरपालिका व पोलीस प्रशासन कितपत प्रतिसाद देतात हे पहावे लागेल.

    पंढरपूर शहरांमध्ये दुकानदाराने केलेल्या या अतिक्रमणामुळे कॅरिडार सारखी उपक्रम हे पंढरपूर शहरांमध्ये राबवली जात आहेत. रस्ते रुंदीकरण करण्याचे काम योजले जात आहे. पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांनी या अतिक्रमणाच्या बाबतीत गांभीर्याने घेऊन शासन व प्रशासनाला नगरपालिकेला सहकार्य करायला हवे इच्छा देखील पंढरपूर रहिवासी करत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....