"दि.पंढरपूर मर्चंट को .ऑप.बॅंक लि.पंढरपूर टेंभुर्णी शाखेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन "..ह.भ.प.प्रभाकर दादा बोधले यांच्या शुभहस्ते संपन्न....
पंढरपूर ( प्रतिनिधी ). टेंभुर्णी शहरातील नामवंत असलेली दि पंढरपूर को-ऑपरेटिव मर्चंट बँक या बँकेची टेंभुर्णी येथील नवीन शाखेच्या वास्तूचा उद्घाटन समारंभ आज रोजी ह.भ.प प्रभाकर दादा बोधले महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.
माढा तालुक्यातील टेंभुर्णी या गावी असलेली एक सुप्रसिद्ध व्यापारी बँक म्हणून ओळखली जाणारी दि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या टेंभुर्णी येथील नवीन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ह.भ.प प्रभाकर दादा बोधले महाराज यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेले काम ,वारसा तो वाढवण्याचे काम पुढील पिढीने करायचा असतो.नवीन काही करण्या अगोदर आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेली जी ठेव आहे ती वाढवण्याचे काम केले पाहिजे.त्याप्रमाणे आपल्या पंढरपूर मर्चंट बँकेच्या आजी-माजी संचालकांनी सभासदांनी व ठेवीदारांनी ज्या ठेवींची वाढ व जपवणूक करण्याचे काम ही पुढील संचालक मंडळ कर्मचारी सभासद हे करीत असतात. अशाच प्रकारे या बँकेच्या ठेवी या वाढत जाव्यात अशी मनोकामना ह.भ प. प्रभाकर दादा बोधले महाराज यांनी आज उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित म्हणून पंढरपूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश काका भोसले, चेअरमन शीतल विद्याधर तंबोली व्हाईस चेअरमन वसंत धोंडीबा शिखरे संचालक भारत भिंगे, आदित्य फतेपुरकर, श्याम गोगाव, सोमनाथ डोंबे, संचालिका व मॅनेजिंग कमिटीच्या चेअरमन सौ . भोसले ,सौ.सुनंदा पद्म कुमार गांधी संचालिका,सुधीर भाऊ भोसले, राजेंद्र फडे , सुनिल मोहिते,व अन्य संचालक मंडळ आणि टेंभुर्णी सभासद ठेवीदार व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
टेंभुर्णी येथील पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन वास्तूच्या उभारणीसाठी अथकपणे प्रयत्न करणारे बँकेचे सर व्यवस्थापक अतुल म्हमाने,उपव्यवस्थापक कुलकर्णी, टेंभुर्णी शाखाधिकारी मिरासाहेब दाळवाले व टेंभुर्णी शाखेतील कर्मचारी उपस्थित होते. नवीन वास्तूच्या उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा