"आमदार समाधान दादा अवताडे यांनी मरीआई वाले समाजबांधवाची केली दिपावली गोड"...


 पंढरपूर ( प्रतिनिधी ) मरीआई वाले समाज  हा गेल्या कित्येक वर्षापासून वंचित असलेला समाज म्हणून ओळखला जातो. या मरी आई वाले समाजामधील बांधव अतिशय हलकीचे जीवन जगत आहेत. हे मरी आई वाले समाज बांधव गावाबाहेरील उघड्या शेतमाळावर आपल्या झोपड्या टाकून राहतात राहूटी  टाकून राहतात. ऊन, पाऊस, वारा ,थंडी अशा परिस्थितीमध्ये ते या झोपडी मधून राहतात, राहुटी मधून राहतात.  अशा बांधवांना दीपावलीच्या निमित्ताने मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी या ठिकाणी राहत असलेल्या मरीआई वाले समाजातील बांधवांना दीपावलीच्या निमित्ताने साडी, कपडे फराळाचे साहित्य यांचे वाटप करून त्या गोरगरीब असलेल्या मरीआईवाले समाज बांधवांची दीपावली यंदाच्या वर्षी आमदार समाधान आवताडे यांनी गोड केली. मरीआई वाले समाज बांधवांनी आमदार समाधान आवताडे यांची आभार मानले. 

     या वेळी मरीआई वाले समाज बांधव तसेच गावकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

" दारू पिऊन घाणीमध्ये लोळणाऱ्या बिनसोंडाच्या वाचाळविरांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आय यांच्याकडून जाहीर निषेध "...... गोमूत्र शिंपडणे भाजपाला पडणार महागात......

"डॉ प्रणिता ताई भालके यांना नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांनी दिला पाठींबा "

"मंगळवेढा एसटी बस वाहकाला दया माया नाही.‌‌....... एसटी बस पास नसल्याच्या कारणाने विद्यार्थ्याला भर हायवे व रस्त्यावर उतरवण्यात आले"