" प्रशांतराव आम्ही सत्तेत नाही असे म्हणू नका... आम्ही सत्तेत आहोत म्हणजे तुम्ही देखील सत्तेत आहात"... ... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंढरपूर ( प्रतिनिधी) प्रशांतराव आम्ही सत्तेत नाही असे म्हणू नका आम्ही सत्तेत आहोत म्हणजेच तुम्ही देखील सत्तेत आहात. असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रोजी श्रीपुर या ठिकाणी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याप्रसंगी त्याने आपले मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून वेळ काढत त्यांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळा अनावरण व अन्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे शब्द प्रशांत रावांना दिल्यानंतर या ठिकाणी आलो असता परिचारक गटाकडून कोणालाही निमंत्रण जास्त प्रमाणात देता आले नाही. तरी देखील स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या वरील प्रेमापोटी या ठिकाणी आलेला हा जनसमुदाय पाहता स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या कार्याची महती दिसून येते.
स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संत नेतृत्व, अनुभवी नेतृत्व, निस्वार्थी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या समवेत काम करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे त्यांचे मार्गदर्शन देखील मला लाभले. हे मी भाग्यवान समजतो. आज पांडुरंग सहकारी साखर कारखान्या या ठिकाणी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याच्या अनावरण तसेच कारखान्याचे विस्तारीकरणाच्या शुभारंभासाठी या ठिकाणी येण्याचा योग आला. परिचारक गटाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची कायमची भूमिका आहे. आम्ही सत्तेत आहोत म्हणजे तुम्ही देखील सत्तेत आहात. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या कार्याचा वारसा हा पुढे प्रशांतरावानी चालवावा. सुधाकर पंत परिचारक यांच्या कार्याचा वारसा त्यांनी पुढे चालवावा. अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
आजच्या या पुतळा अनावरण कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील आजी-माजी आमदार खासदार कार्यकर्ते शेतकरी सभासद व परिचारक प्रेमी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा