"कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण " मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते...


 पंढरपूर ( प्रतिनिधी) . पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते तसेच सहकार क्षेत्रातील डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. 

     श्रीपुर येथील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार असून सर्व शेतकरी सभासद कार्यकर्ते तसेच स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक प्रेमी हे उपस्थित राहणार आहेत. 

     सोलापूर जिल्ह्याला तसेच महाराष्ट्राला लाभलेले विठुरायाच्या नगरीतील संत म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी शेतकरी कष्टकरी तसेच कामगार यांच्या कल्याणासाठी व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपले कार्य केले. कित्येक कुटुंबाचे कल्याण केले . आर्थिक डबघाईला आलेले साखर कारखाने आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी त्यांनी राबवलेली काटकसरीची मोहीम ही संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजली गेली. सहकार क्षेत्राप्रमाणेच महाराष्ट्र राज्य परिवहन खाते याचे मंडळाचे अध्यक्ष असताना एसटी महामंडळ डबघाईला आलेले असताना या एसटी महामंडळाला फायद्यात आणण्याचे काम कोणी केले असेल तर ते स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी अशा मानव रुपी ईश्वरी अवताराला कुणी संत,तर कुणी पंत, कुणी मालक म्हणू लागले अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याचे अनावरण उद्या दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्या या ठिकाणी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्य चे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. अशी माहिती विधानपरिषद चे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव बँके ला आदर्श बँक पुरस्कार प्राप्त"

"धनगर समाज आरक्षणाचा फटका भालके, आवताडे यांना बसणार का? ".. रासपा चे उमेदवार पंकज देवकते यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार......

राष्ट्रीय समाज पक्षाचा( रासप) सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला बसणार जोरदार फटका... पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात रासप डोकेदुखी ठरणार....