"84 कोटीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार".......... आमदार समाधान दादा अवताडे
पंढरपूर ( प्रतिनिधी) . अतिवृष्टीचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतामधील पिकांचे त्याचप्रमाणे मका सूर्यफूल बाजरी टोमॅटो मिरची कांदा भुईमूग उडीद दोडका डाळिंब पेरू या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात दिलेला असून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील 88 हजार पाचशे पाच शेतकऱ्यांच्या खात्यावर 84 कोटी 45 लाख रुपये नुकसान भरपाई जमा करणे होण्यास सुरुवात झाली असून दिवाळी सर्व नुकसान भरपाई खात्यावर जमा होणार आहे अशी माहिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी आज रोजी दिली.
यंदाचा खरीप पिकांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेले आहे. या संकटाशी सामना करण्याचे शेतकऱ्यांना बळ देण्या साठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार समाधान आवताडे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला . माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची झालेली नुकसान त्याची भरपाई ची मागणी आमदार समाधान दादा अवताडे यांनी केली असता 84 कोटी 45 लाख रुपये नुकसान भरपाईचा निधी मंजूर केला आहे.
पंढरपूर तालुक्यांमध्ये 28 हजार 775 बाधित शेतकरी असून 26 कोटी 45 लाख रुपये मदत जाहीर झालेली आहे. मंगळवेढा तालुक्यातील 59 हजार 730 शेतकऱ्यांना 58 कोटी रुपये मदत मंजूर झाले असून आजपासून हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील. सतत पाठपुरावा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी रात्रंदिवस अधिकाऱ्यांना कामाला लावून त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होईल याचे समाधान वाटते असे आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा